दैनंदिन खर्च भागल्यानंतर आपण वर राहीलेल्या संपत्तीची बचत करण्याचा विचार करतो. ही बचत योग्य पद्धतीने झाल्यास आपल्याला त्यातून योग्य तो परतावा मिळण्याची शक्यता असते. आता हा परतावा चांगला मिळावा यासाठी योग्य पर्याय कोणते असतात हे माहित असणे गरजेचे आहे. ही बचत आपल्याला पुढे एखादी मोठी खरेदी, घरातील कोणाचे आजारपण किंवा एखादी सहल यांसाठी निश्चितच उपयोगी पडू शकते. पाहूयात असेच काही गुंतवणुकीचे पर्याय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्युच्युअल फंड्‌स

म्युच्युअल फंड्‌स हा गुंतवणुकीचा एक आकर्षक पर्याय आहे. तुम्ही ५०० रुपये एवढ्या छोट्याशा रकमेपासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. एवढेच नव्हे, तर तुम्ही जर दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक केली, तर म्युच्युअल फंड्‌स तुम्हाला भरघोस परतावा मिळवून देतात. उदाहरणार्थ, इक्विटी म्युच्युअल फंडांतून दरवर्षी १०-१५ टक्के एवढा दीर्घकालीन परतावा मिळू शकतो. काही अव्वल दर्जाच्या फंडांतून तर परताव्याची ही टक्केवारी १९ टक्क्यांपर्यंतही जाऊ शकते.

सोने

ज्याचा विविध मार्गांनी विचार केला जाऊ शकतो असा गुंतवणुकीचा हा अजून एक पर्याय. तुम्ही दागदागिने, ईटीएफज्‌, म्युच्युअल फंड्‌स आणि स्कीम्स इत्यादींच्या माध्यमातून सोने खरेदी करू शकता. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या महत्त्वाच्या पैलूंपैकी एक आहे तो म्हणजे त्याची किंमत वाढत असते. तुम्ही ऑनलाईन गोल्ड ईटीएफज् खरेदी-विक्री करू शकता. सोन्यातील गुंतवणूक म्हणजे रोकडसुलभता, कारण तुम्ही काही मिनिटांमध्येच कोणत्याही एक्झिट लोडशिवाय युनिट्‌सची खरेदी-विक्री करू शकता.

मुदतठेवी

मुदतठेवीमध्ये एकदाच मोठी रक्कम ठेवल्याने तुम्हाला मोठे आणि सुरक्षित उत्पन्न मिळू शकते. नामांकित कंपन्या मुदतठेवींवर ८.७० टक्के ते ८.७५ टक्के व्याजदर देतात. मुदतठेवींवर स्वार होऊन आणि तुमच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी फंडातील व्याजाचा वापर करण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. काही बँका किंवा संस्था तुमच्या मुदतठेवीचे नूतनीकरण केल्यास अतिरिक्त व्याज देऊ करतात आणि त्याचा कोलॅटरल म्हणूनही वापर करू देतात.

एकूण काय तर, तुमच्याकडे अजूनही गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय नसेल, तर निश्चित परतावा देणारे हे फायदे म्हणजे तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत. जेव्हा तुमच्याकडे आजारपणामुळे किंवा नोकरी गेल्याने आर्थिक आणीबाणी निर्माण होते तेव्हा या फंडासारखे फंड तुमच्या मदतीला येतात. जेव्हा पैशातील उत्पन्न कमी होते तेव्हा ह्यासारखे मजबूत, सुरक्षित फंड्‌स उत्पन्नाचे पर्यायी साधन म्हणून काम करतात.

बाँड्‌स

टॅक्स-फ्री बाँड्‌स हे कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहेत. टॅक्स-फ्री बाँड्‌समुळे तुम्हाला तुमच्या उत्पन्नात वाढ करीत असतानाच तुमचे करपात्र उत्पन्न कमी करण्याचा पर्याय खुला होतो. या बाँड्‌सचा मुदपूर्तीचा कालावधी १०, १५ किंवा २० वर्षांचा असतो आणि त्यातून सुरक्षित परतावा मिळत असतो. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, एनएचएआय, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि इतर सरकारी एजन्सीज्‌ पायभूत सुविधांची कामे हाती घेण्यासाठी हे बाँड्‌स जारी करीत असतात. टॅक्स-फ्री बाँड्‌सवर सुमारे ८ टक्के व्याज मिळत असते आणि ते १०० टक्के करमुक्त असते.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One should know investment options for saving
First published on: 25-09-2018 at 15:43 IST