27 February 2021

News Flash

बहुप्रतिक्षित one plus 5 T लावा रेड अखेर भारतात दाखल

२० जानेवारीला अॅमेझॉनच्या सेलमध्ये उपलब्ध

भारतात मोबाईल मार्केटमधील स्पर्धा वाढली असून जवळपास दररोज कोणत्या ना कोणत्या कंपनीचा नवीन मोबाईल लाँच होत आहे. भारतात मागील अनेक दिवसांपासून one plus 5 T या फोनची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. नुकतीच या फोनची लावा रेड एडिशन देशात लाँच करण्यात आली असून ग्राहकांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्यामुळे तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर या मोबाईलचा नक्कीच करु शकता.

या फोनला अतिशय आकर्षक फिचर्स देण्यात आले असून त्यामध्ये ६ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आणि १२८ जीबी एक्स्पांडेबल मेमरी देण्यात आली आहे. या फोनची डिझाईन आणि फिचर्स आकर्षक असल्याने तो ग्राहकांच्या पसंतीस पडेल असा विश्वास कंपनीचे महाप्रबंधक विकास अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. यामध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट आणि २० मेगापिक्सल बॅक कॅमेरा देण्यात आला आहे. याबरोबरच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर वापरला आहे. तर ६ इंचाची स्क्रीन असलेल्या या फोनला फुल-ऑप्टिक एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची किंमत ३७,९९९ रुपये असून भारतात तो प्रत्यक्ष विक्रीसाठी २० जानेवारीला अमेझॉनच्या सेलवर उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2018 2:14 pm

Web Title: oneplus 5t lava red edition launched in india available on amazon from 20 january
Next Stories
1 दिवसभर बसून काम करताय? ‘हे’ व्यायाम नक्की करा
2 अतिसंवेदनशील मेंदूमुळेच रुग्णांमध्ये तीव्र डोकेदुखी
3 कामानिमित्त अतिप्रवासामुळे नैराश्याचा धोका
Just Now!
X