OnePlus 6T या बहुचर्चित स्मार्टफोनचं थंडर पर्पल एडिशन भारतात लाँच झालं आहे. कंपनीकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच हे एडिशन चीनमध्ये लाँच करण्यात आलं होतं. भारतात 16 नोव्हेंबरपासून अॅमेझॉन, वन प्लसचं अधिकृत संकेतस्थळ, रिलायंस डिजीटल आणि क्रोमा स्टोअर्समध्ये हे स्पेशल एडिशन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. थंडर पर्पल एडिशन दिसण्यास अत्यंत आकर्षक असून याचं डिझाइन उत्तम आहे.

OnePlus 6T च्या या स्पेशल एडिशनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं असून याची किंमत 41 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. या नव्या एडिशनमुळे आता हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक, मिरर ब्लॅक आणि थंडर पर्पल या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. वन प्लस 6Tच्या बेसिक व्हेरिअंटची म्हणजेच 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्याची किंमत 37 हजार 999 रुपये आहे. टॉप व्हेरिअंटची म्हणजेच 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्याची किंमत 45 हजार 999 रुपये आणि मध्यम व्हेरिअंट म्हणजेच 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्याची किंमत 41 हजार 999 रुपये आहे, आणि आता याच किंमतीत थंडर पर्पल एडिशनही उपलब्ध असणार आहे.

फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स –
वन प्लसच्या या नवीन फोनमधील सर्वात मोठा बदल म्हणजे फोनच्या ६.४ इंच स्क्रीनवर असलेला वॉटरड्रॉप स्टाइलचा नॉच. वन प्लसच्या युझर्सने दिलेल्या सुचनेनुसार हा बदल करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. फोनला ६.४ इंचाची फूल एचडी ओएलईडी स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन क्वॉलकोम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसरवर हा फोन काम करेल. फोनमध्ये ६ जीबी तसेच ८ जीबी रॅमचा आणि १२८ जीबी तसेच २५६ जीबी इंटरनल मेमरी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. या फोनचे बेसिक व्हेरिअंट कंपनीच्या आधीच्या फोनप्रमाणे ६४ जीबी इंटरनल मेमरी ऐवजी थेट १२८ जीबी इंटरनल मेमरीपासून सुरु होईल. वन प्लस सिक्स टीमध्ये तीन कॅमेरा असतील असा अंदाज बांधला जात होता. मात्र फोनमध्ये केवळ दोनच कॅमेरा असतील असे कंपनीने लॉन्च इव्हेंटमध्ये स्पष्ट केले आङे. रेअर कॅमेरा हा २० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स३७६के सेन्सर्स असणार असेल तर फ्रण्ट कॅमेरा १६ मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स५१९ सेन्सर्सचा असेल.फोनमध्ये स्टुडिओ लायटनिंग आणि नाईट्स्केप हे दोन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. पोर्टेट मोडमध्ये एखाद्या व्यक्तीचा फोटो काढताना त्याच्या चेहऱ्यावर पडणारा प्रकाश किती असावा हे स्टुडीओ लायटिंगच्या मदतीने ठरवता येईल तर कमी प्रकाशात फोटो काढताना म्हणजेच एचडीआर मोडच्या मदतीने अगदी दोन सेकंदात फोटो काढण्यासाठी नाईट्स्केप फिचर वापरता येईल. फोनमध्ये ३७०० एमएएचची बॅटरी आहे. कंपनीचा सध्याचा प्लॅगशिप फोन असणाऱ्या वन प्लस सिक्सच्या बॅटरीपेक्षा ही बॅटरी ३७ टक्क्यांनी जास्त शक्तीशाली आहे. गेम खेळणाऱ्यांसाठी हा फोन खास असेल कारण यामध्ये स्टेबिलायझर म्हणजे फोनमधील ग्राफिक्स स्थिर राहण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. हा फोन अॅण्ड्रॉइड ९ पायवर काम करेल. या फोनमध्ये स्मार्ट बुस्टर हे विशेष फिचर उपलब्ध करुन देण्यात आले असून यामुळे मोबाइलच्या रॅम तसेच रॉमवर पडणारा ताण कमी करुन बुटिंगसाठी लागणारा वेळ कमी करता येईल. फोनला एनएफसी आणि फोर जी व्होल्ट कनेक्टीव्हिटीचे पर्याय देण्यात आले आहेत.