वनप्लस 7 स्मार्टफोनची 4 जून अर्थात आजपासून भारतात विक्री सुरू होत आहे. अॅमेझॉनच्या संकेतस्थळावरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. वनप्लस 7 आणि वनप्लस 7 प्रो हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीने गेल्या महिन्यातच लाँच केले होते. यातील वनप्लस 7 प्रो या स्मार्टफोनची विक्री यापूर्वीच सुरू झाली. मात्र, वनप्लस 7 आजपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. वनप्लसच्या अधिकृत संकेतस्थळावरुनही हा फोन खरेदी करता येईल.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 2 हजार रुपयांची सवलत मिळेल. तसंच हा फोन नो कॉस्ट इएमआयवर खरेदी करण्याचाही ग्राहकांकडे पर्याय असणार आहे. याशिवाय 9300 रुपयांचा फायदा रिलायंस जिओच्या ग्राहकांना मिळेल.

6GB RAM आणि 128 GB इंटरनल स्टोरेज व 8GB RAM आणि 256 GB इंटरनल स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये हा फोन उपलब्ध असेल. अनुक्रमे 32 हजार 999 आणि 37 हजार 999 इतकी या दोन्ही व्हेरिअंट्सची किंमत आहे. फोनमध्ये मागील बाजूला ट्रिपलऐवजी ड्युअल कॅमेऱ्याचा सेटअप(48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल)असून सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर 3 हजार 700 मिलिअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

अन्य स्पेसिफिकेशन्स –
वॉटरड्रॉप नॉच 6.41 इंचाचा फुल एचडी प्लस ऑप्टीक एमोल्ड डिस्प्ले
कॉर्निंग गोरिला ग्लास 6
अॅण्ड्राइड 9 पाय बेस्ड ऑक्सिजन ओएसवर असणारं क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर