अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला वन प्लस 7 हा स्मार्टफोन अखेर भारतात लवकरच लाँच होणार आहे, यासोबतच कंपनी वन प्लस 7 प्रो हा नवा स्मार्टफोन देखील लाँच करण्याच्या तयारीत आहे. पुढील महिन्यात म्हणजेच 14 मे रोजी हे दोन्ही फोन भारतात लाँच होणार आहेत. हा फोन भारतासह अमेरिका, चीन आणि युरोपमध्ये एकाचवेळी लाँच केला जाणार असल्याची माहिती आहे.

वन प्लस कंपनीने त्यांच्या ट्विटर हॅन्डलवरून याबाबत माहिती दिली केली आहे. मात्र, लाँचिंगआधीच या दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन इंटरनेटवर लीक झाले आहेत. वनप्लस 7 मध्ये 90 एचडी डिस्प्ले असू शकतो, अशी माहितीही समोर येत आहे. या फोनच्या लॉन्चसाठी कंपनीने ‘गो बियॉन्ड स्पीड’ अशी टॅगलाईन दिली आहे. वनप्लस 7 प्रोचं 5जी व्हर्जनही ही येणार असल्याची माहिती कंपनीने सीईओ पीट लाऊ यांनी दिली. भविष्यातील स्मार्टफोनवरील पडदा आम्ही हटवणार आहोत. या स्मार्टफोनमध्ये टॉप क्लास टेक्नोलॉजीचा समावेश असणार आहे, असंही लाऊ यांनी सांगितलं.

OnePlus 7 मध्ये 5जी सपोर्ट देणारा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 एसओसीसह लाँच केला जाणार असल्याची चर्चा आहे. हा प्रोसेसर गेल्या वर्षीच्या मोबाईल काँग्रेसमध्ये लाँच झाला होता, त्याचवेळी OnePlus 7 चे पेटे लाऊ यांनी हा प्रोसेसर नव्या मोबाइलमध्ये वापरणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे वनप्लस 7 हा 5G सपोर्ट असलेला हा पहिला स्मार्टफोन असू शकतो.

लऊ यांनी सांगितले की हा नवा फोन डिस्प्लेच्या बाबतीत याआधीच्या फोनपेक्षा अधिक चांगला असणार आहे. या फोनच्या डिस्प्लेवर कंपनी तिप्पट खर्च करणार असल्याचेही लऊ यांनी सांगितले. या फोनमध्ये 90Hz पेक्षा जास्त रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. यापूर्वी अॅपलच्या आयपॅड प्रो मध्ये 120Hz डिस्प्ले वापरण्यात आला आहे. त्यामुळे वनप्लसच्या या नव्या फोनचा डिस्प्ले आतापर्यंतचा कंपनीचा सर्वोत्कृष्ट असणार आहे.

OnePlus 7 हा स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. यातील बेसिक मॉडेलमध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज दिले जाण्याची शक्यता असून, वन प्लस 7 प्रो 8 जीबी रॅम आणि 256जीबी इंटर्नल स्टोरेजसह ग्राहकांसाठी उपलब्ध होईल अशी चर्चा आहे. याशिवाय कंपनी लवकरच वन प्लस 7 प्रोचे तिसरे मॉडेलही बाजारात आणणार असून, त्यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज असणार आहे. वन प्लस 7 आणि वन प्लस 7 प्रो या दोन्ही फोन्समध्ये स्नॅपड्रॅगनचा लेटेस्ट प्रोसेसर दिला जाणार आहे. वन प्लस 7 ला 6.4 इंच आणि 7 प्रो ला 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात येणार आहे. तर 7प्रो मध्ये मुख्य कॅमेरा 48मेगापिक्सल आणि दुसरा 8 मेगापिक्सलचा असून, यामध्ये 3X ऑप्टिकल झूमचा पर्याय देण्यात येईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.