OnePlus 7T and OnePlus TV India Launch, Expected Price, Specifications : बहुप्रतीक्षित OnePlus 7 T मोबाइल आणि वनप्लस टीव्ही आज गुरूवारी भारतात लाँच होणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये याचा अनावरण सोहळा रंगणार आहे. याशिवाय, टी सीरीज मधील ‘OnePlus 7 T Pro’ १५ ऑक्टोबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये वेगवान चार्जिंगसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यानुसार ३० मिनिटांत बॅटरी ५० टक्के चार्ज होणार. वनप्लसचे सीईओ पेटे लाउ यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर मोबाइलच्या तुलनेत २३ टक्के वेगाने बॅटरी चार्ज होईल.

OnePlus 7 T चे फिचर्स –
– पड्रैगन 855+ प्रोसेसर
– सेन्सरसोबत ६.५५ इंचाचा अमॉल्ड डिस्प्ले
– फ्रिंगरप्रिंट
– १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज वेरिएंट
– ४८ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरा
– ३,८०० एमएच बॅटरीची क्षमता असेल.

OnePlus 7 T Pro चे फिचर्स –
– ६.५५ इंचाचा अमॉल्ड क्यूएचडी प्लस डिस्प्ले
– फ्रिंगरप्रिंट
– ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज
– ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा
– अल्ट्रा वाइड लेन्स
– ४,०८५ एमएच बॅटरी

‘वनप्लस टीव्ही’चे फिचर्स
– Android TV बेस्ड कस्टम ऑपरेटिंग सिस्टम
– ५५ इंच वेरियंटमध्ये लाँच
– हाय-एंड वेरियंट 4kHDR डिस्प्लेला
– ८ इनबिल्ड स्पिकर
-गूगल प्ले स्टोर वापरता येणार