वनप्लस कंपनीने गेल्या महिन्यातच आपल्या स्मार्टफोनची नवीन OnePlus 8 सीरिज लॉन्च केली. यानंतर कंपनीने आधीपासून बाजारात असलेल्या OnePlus 7T Pro (Haze Blue) स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीकडून 6,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. किंमतीतील ही कपात कायमस्वरुपी असेल असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे आता OnePlus 7T Pro हा स्मार्टफोन वनप्लस स्टोअर आणि अन्य प्लॅटफॉर्म्सद्वारे नव्या किंमतीमध्ये खरेदी करता येणार आहे.

देशातील काही भागांमध्ये लॉकडाउन शिथील झाल्याने स्मार्टफोन्सची विक्री सुरू झालीये, यासोबतच वनप्लसने बजाज फायनान्ससोबतच्या भागीदारीअंतर्गत एक खास ऑफरही आणली आहे. ही ऑफर OnePlus 7 Pro आणि OnePlus 7T सीरिजच्या ग्राहकांसाठी आहे. संपूर्ण किंमतीच्या केवळ एक तृतियांश किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी कंपनी देत आहे. उर्वरित रक्कम भरण्यासाठी कंपनीकडून ग्राहकांना 12 महिन्यापर्यंत लो-कॉस्ट इएमआयचा पर्याय आहे. इ-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर ग्राहकांना या ऑफर्सचा लाभ मिळेल.

OnePlus 7T Pro के स्पेसिफिकेशन्स :-
स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच क्वॉड एचडी+ फ्लूइड AMOLED डिस्प्ले आहे. प्रोटेक्शनसाठी 3D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आलाय. ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि 8 मेगापिक्सलचा एक टेलिफोटो सेन्सरही आहे. सेल्फीसाठी यामध्ये 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा मिळेल. हा फोन केवळ 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. फास्ट चार्जिंग सपोर्टसह या फोनमध्ये 4,085mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

नवीन किंमत :-
6000 रुपयांनी किंमतीत कपात झाल्याने OnePlus 7T Pro आता 47,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.