OnePlus 7T Pro McLaren Edition ची विक्री भारतीय बाजारपेठेत सुरू करण्यात आली आहे. सध्या अ‍ॅमेझॉनवर याची विक्री सुरू असून मोठ्या प्रमाणात हा फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. अनोख्या पद्धतीनं डिझाईन करण्यात आलेलं फोनचं बॅक पॅनल हे या मोबाईलला अन्य मोबाईलपेक्षा वेगळं करतं. OnePlus 7T Pro McLaren Edition मध्ये १२ जीबी रॅम आणि ९० हर्ट्झ अ‍ॅमोलेड डिस्ल्पे देण्यात आला आहे. तसंच या मोबाईलचे अन्य फीचर्स OnePlus 7T प्रमाणेच देण्यात आले आहेत.


भारतीय बाजारपेठेत या मोबाईलची किंमत ५८ हजार ९९९ रूपये इतकी आहे. तसंच १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेलं हे एकमेव व्हेरिअंट आहे. वनप्लस 7 टी प्रो मॅकलेरन एडिशन आजपासून OnePlus ऑनलाइन स्टोअर्स आणि अ‍ॅमेझॉनवर ओपन सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये अ‍ॅड्रॉईड १० वर आधारित ऑक्सिजन ओएस १० देण्यात आली आहे. तसंच यामध्ये ६.६७ इंचाचा (१४४०*३१२० पिक्सेल) फ्लूइड अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच हा डिस्प्ले ५१६ पीपीआय पिक्सेल डेनसिटी, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, ३ डी कॉर्निंग गोरिला ग्लास आणि १९:५:९ आस्पेक्ट रेशोसोबत येतो. मॅकलेरन एडिशनमध्ये २५६ जीबीचं इनबिल्ट स्टोरेजही देण्यात आलं आहे. परंतु यामध्ये मायक्रो एसडी स्लॉट देण्यात आलेला नाही.


OnePlus 7T Pro McLaren Edition मध्ये तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. तसंच यामध्ये प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. ऑप्टिकल इमेज स्टेबिलाझर आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाझरसह हा कॅमेरा देण्यात आला आहे. तर ८ मेगापिक्सेलच्या टेलिफोटो लेन्ससह १६ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेराही या मोबाईलचं मुख्य आकर्षण आहे. रिअर कॅमेऱ्याच्या सहाय्यानं 4K व्हिडीओदेखील शूट करता येणार आहे. कॅमेरा अ‍ॅपमध्ये कंपनीनं पोर्टेट, अपग्रेडेड अल्ट्राशॉट इंजिन, नाइटस्केप, प्रो मोड एआय सीन डिटेक्शन, पॅनोरमा, एचडीआर, टाइम-लॅप्स आणि रॉ इमेज सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. यामध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा Sony IMX471 कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.


OnePlus 7T Pro McLaren Edition मध्ये ४ हजार ८५ एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसंच हा मोबाईल ३० टी फास्ट चार्जरही सपोर्ट करतो. कनेक्टिव्हीटी फिचर्समध्ये ४जी वोलटीई, वायफाय ८०२.११ एसी, ब्लूटूथ ५.०, जीपीएस/ ए जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसंच यात एक्सेलेरोमीटर, अँबियंट लाइट सेन्सर, जायरोस्कोप, इलेक्ट्रॉनिक कंपास, सेन्सर कोर, लेझर सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सरही देण्यात आले आहेत. या फोनमध्ये फेस अनलॉकसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.