News Flash

OnePlus चा 7T आणि टीव्ही भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

OnePlus 7 चे अपग्रेडेड व्हर्जन असून यामध्ये काळानुसार अपडेड्स दिल्याचा दावा कंपनीने केला आहे.

OnePlus 7T and OnePlus TV Launch : बहुप्रतीक्षित OnePlus 7T मोबाइल आणि वनप्लस टीव्ही गुरूवारी भारतात लाँच झाला. वनप्लसच्या स्मार्टफोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये इतकी असून टीव्हीची किंमत ६९ हजार ९९० रुपये इतकी आहे. OnePlus 7T हा मोबाइल OnePlus 7 चे अपग्रेडेड व्हर्जन असून यामध्ये काळानुसार अपडेड्स दिल्याचा दावा कंपनीने केला आहे. One Plus 7T ची विक्री अॅमेझॉनच्या प्राईम मेंबर्ससाठी २८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या फोनमध्ये तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 48MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर,117° अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2x टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे.

OnePlus 7T या स्मार्टफोनमध्ये कंपनीने दोन पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय ८ जीबी रॅम आणि १२८ स्टोरेज असा असून या फोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅम २५६ स्टोरेजच्या फोनची किंमत ३९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून या फोनमध्ये ३,८०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या वनप्लस ७ टीमध्ये दमदार प्रोसेसर, कॅमेरा आणि मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. नव्या स्मार्टफोनच्या टचस्क्रीनवर कंपनीने विशेष लक्ष दिले आहे.

स्मार्टफोनमध्ये आणखी काय ?

स्नॅपड्रॅगन 855+ सोबत 90Hz स्क्रीन
६.५५ फुल एचडी प्लस फ्लूयड एलईडी
१६ मेगापिक्सल अल्ट्रवाइड
१२ मेगापिक्सल टेलेफोटो
क्वालक्वाम स्नॅपड्रॅगन ८५५
फ्रिंगरप्रिंट

‘वनप्लस टीव्ही’चे फिचर्स
Android TV बेस्ड कस्टम ऑपरेटिंग सिस्टम
५५ इंच वेरियंटमध्ये लाँच
हाय-एण्ड वेरियंट 4kHDR डिस्प्लेला
८ इनबिल्ड स्पिकर
गूगल प्ले स्टोर वापरता येणार
Dolby Atmos आणि Dolby Vision चे सपोर्ट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 9:45 am

Web Title: oneplus 7t to launch in india heres everything we know so far nck 90
Next Stories
1 वनप्लस ७टी सिरीज आणि वनप्लस टीव्ही आज भारतात होणार लाँच, जाणून घ्या सर्वकाही
2 PF धारकांच्या खात्यात जमा होणार व्याजाचे ५४ हजार कोटी रूपये
3 Redmi 8A : ‘शाओमी’ने लाँच केला ‘स्वस्त’ स्मार्टफोन, किंमत किती?
Just Now!
X