OnePlus 8 हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्याकडे चांगली संधी आहे. OnePlus 8 आज(दि.8) दुपारी 12 वाजेपासून अ‍ॅमेझॉन आणि वनप्लस वेबसाइटवर ‘सेल’मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर अनेक आकर्षक ऑफर्सही आहेत.

स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर :-
OnePlus 8 ची बेसिक किंमत 44,999 रुपये आहे. ही किंमत 8जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची आहे. तर, 12जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 49,999 रुपये आहे. वनप्लसचा हा फोन ग्लेशियल ग्रीन, ऑनिक्स ब्लॅक आणि इंटरस्टेलर ग्लो कलर अशा तीन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. अ‍ॅमेझॉन आणि OnePlus.in दोन्ही प्लॅटफॉर्मवर ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आहेत. ग्राहकांना SBI च्या कार्डवर किंवा इएमआयवर 2,000 रुपये डिस्काउंट मिळेल.  तसेच, 12 महिने नो-कॉस्ट इएमआय आणि जिओच्या ग्राहकांना 6,000 रुपयांपर्यंत ‘जिओ बेनेफिट्स’चीही ऑफर आहे.

OnePlus 8 के स्पेसिफिकेशन्स :-
वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंच फुल HD+ अ‍ॅमोलेड स्क्रीन आहे. ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि 12GB पर्यंत रॅमचा पर्याय असलेला हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित OxygenOS वर कार्यरत आहे. फोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप असून यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल क्षमतेचा आहे. याशिवाय अन्य दोन कॅमेरे 16 आणि 2 मेगापिक्सलचे आहेत. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज अशा दोन पर्यायांमध्ये हा फोन येतो. पण दोन्ही व्हेरिअंटमध्ये माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवता येत नाही. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G सपोर्ट, 4G LTE, वाय-फाय 6 आणि USB टाइप-सी पोर्ट आहे. 4,300 mAh क्षमतेची बॅटरी असलेल्या या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरही आहे.