21 September 2020

News Flash

OnePlus 8 Pro चा पुन्हा ‘सेल’, Jio युजर्सना मिळेल ₹6000 पर्यंतचा फायदा

लेटेस्ट स्मार्टफोन ‘वन प्लस 8 प्रो 5G’ खरेदी करण्याची पुन्हा संधी...

वन प्लस कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन ‘वन प्लस 8 प्रो 5G’ (OnePlus 8 Pro 5G) खरेदी करण्याची आज(दि.2) पुन्हा एकदा संधी आहे. या स्मार्टफोनसाठी अ‍ॅमेझॉन इंडिया आणि OnePlus.in. वर खास सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजेपासून या सेलला सुरूवात होत आहे. सेलमध्ये अ‍ॅमेझॉन पेद्वारे पेमेंट करणाऱ्यांना 1,000 रुपये डिस्काउंटची ऑफर आहे. तर, हा फोन खरेदी करणाऱ्या रिलायन्स जिओच्या ग्राहकांना 6,000 रुपयांपर्यंतचा विविधप्रकारे फायदा मिळेल. याशिवाय 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट इएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

OnePlus 8 Pro स्पेसिफिकेशन्स आणि किंमत :-

OnePlus 8 Pro स्मार्टफोनमध्ये HDR10+ सपोर्ट आणि गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह 6.78 इंचाचा QHD+ Fluid AMOLED डिस्प्ले आहे. लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसह या फोनमध्ये 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात एक कॅमेरा 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, दुसरा 48 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आहे. याशिवाय, 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा कलर फिल्टर लेंसही आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. अँड्रॉइड 10 आधारित OxygenOS वर कार्यरत असणाऱ्या या फोनमध्ये 4510mAh ची बॅटरी आहे. हा स्मार्टफोन अल्ट्रामरीन ब्लू, ऑनिक्स ब्लॅक आणि ग्लेशियल ग्रीन अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 54,999 रुपये आहे. तर, 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 59,999 रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 10:27 am

Web Title: oneplus 8 pro to go on sale reliance jio users can avail benefits up to rs 6000 sas 89
Next Stories
1 भारतात डाउन झालं Gmail, युजर्सची ट्विटरवर तक्रार
2 डोळे येणे म्हणजे काय? जाणून घ्या डोळ्यांच्या संसर्गाची लक्षणं, कारणं आणि त्यावरील उपचार
3 फक्त सुगंधच नाही, तर ‘या’ फुलांमध्ये आहेत औषधी गुणधर्म!
Just Now!
X