News Flash

OnePlus 9 सीरिज भारतात लाँच, कंपनीने OnePlus Watch देखील आणलं; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

'वनप्लस'चे तीन लेटेस्ट स्मार्टफोन - OnePlus 9, OnePlus 9 PRO, OnePlus 9R भारतात लाँच

आघाडीची स्मार्टफोन कंपनी OnePlus ने अखेर भारतात आपली लेटेस्ट OnePlus 9 Series लाँच केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीने बहुप्रतिक्षित वनप्लस 9, वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9आर (OnePlus 9, OnePlus 9 PRO, OnePlus 9R) हे तीन स्मार्टफोन आणलेत. OnePlus 9 सीरिजसोबतच कंपनीने भारतीय मार्केटमध्ये OnePlus Watch देखील आणलं आहे.

OnePlus 9 स्पेसिफिकेशन्स :-
OnePlus 9 मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ Fluid AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेला प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास असून फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. 5G कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट असलेल्या OnePlus 9 च्या 8GB+ 128GB व्हेरिअंटची किंमत 49 हजार 999 रुपये ठेवली आहे. तर, 12GB+ 256 GB व्हेरिअंटची किंमत 54 हजार 999 रुपये आहे.

OnePlus 9R स्पेसिफिकेशन्स :-
OnePlus 9R मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ Fluid AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन Android v11 ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असून यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर आहे. शिवाय 5G कनेक्टिव्हिटीचाही सपोर्ट फोनला आहे. याच्या 8GB रॅम + 128GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आहे. तर, 12GB रॅम + 256GB इंटर्नल स्टोरेज मॉडेलची किंमत 43 हजार 999 रुपये आहे.

OnePlus 9 Pro स्पेसिफिकेशन्स :-
OnePlus 9 Pro मध्ये 6.7 इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले असून पंच-होल डिझाइन आहे. फोनमध्ये अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित Oxygen OS 11 चा सपोर्ट आहे, शिवाय ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरही आहे. यात 12 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज आहे. हा फोन Carbon Black आणि Lake Blue अशा दोन रंगांच्या पर्यायात खरेदी करता येईल.

कॅमेरा आणि बॅटरी :-
फोटोग्राफीसाठी OnePlus 9 Pro मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सेल डिस्टॉर्शन फ्री अल्ट्रा-वाइड लेन्स, 8 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर असा हा चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. याशिवाय सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सेलचा कॅमेराही आहे. तसेच फोनमध्ये कंपनीने Wrap Charging सपोर्ट असलेली 4500mAh क्षमतेची बॅटरी दिली असून फोनमध्ये बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. हा फोन विंटर मिस्ट (Winter Mist), अ‍ॅस्ट्रल ब्लॅक (Astral Black) आणि आर्क्टिक स्काय (Arctic Sky) अशा तीन रंगात खरेदी करता येईल. OnePlus 9 Pro च्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 64 हजार 999 रुपये आहे. तर, 12GB रॅम + 256GB इंटर्नल स्टोरेज मॉडेलची किंमत 69 हजार 999 रुपये आहे.

OnePlus Watch :-
वनप्लसने आपलं पहिलं वॉच OnePlus Watch देखील लाँच केलं आहे. या वॉचला OnePlus TV सोबत कनेक्ट करता येतं. यात 110 पेक्षा जास्त वर्कआउट मोड 1.39 इंचाचा HD AMOLED डिस्प्ले आहे. पॉवरसाठी यात 402mAh क्षमतेची बॅटरी असून एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बॅटरी पाच दिवसांचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. या वॉचमध्ये 4GB इंटर्नल स्टोरेज असून 16 हजार 999 रुपये इतकी याची किंमत ठेवली आहे. हे वॉच मूनलाइट सिल्वर आणि मिडनाइट ब्लॅक अशा दोन रंगांच्या पर्यायात खरेदी करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2021 4:28 pm

Web Title: oneplus 9 oneplus 9 pro oneplus 9r launched in india at a starting price of rs 39999 oneplus watch priced at rs 16999 check details sas 89
Next Stories
1 Vi युजर्सना झटका, सर्व सर्कलमध्ये महाग झाले प्लॅन्स; १०० रुपयांपर्यंत वाढली किंमत
2 स्वस्तात Redmi Note 10 Pro खरेदीची संधी, मिळेल 64MP क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप; जाणून घ्या सविस्तर
3 भारतात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी ६६ टक्के ग्राहक इच्छुक, सर्वेक्षणातून समोर आली माहिती
Just Now!
X