25 September 2020

News Flash

OnePlus चा सर्वात ‘स्वस्त’ फोन, प्री-बुकिंगला होणार सुरूवात

"अ‍ॅफॉर्डेबल प्राइस सेगमेंट"मधला कंपनीचा पहिला फोन

(OnePlus 8, File Photo)

OnePlus Nord हा भारतात आणि युरोपात लाँच होणारा सर्वात स्वस्त वनप्लस स्मार्टफोन असेल अशी घोषणा कंपनीने केली आहे. नवीन वनप्लस नॉर्ड हा “अ‍ॅफॉर्डेबल प्राइस सेगमेंट”मधला कंपनीचा पहिला फोन असेल. या महिन्यात कंपनी हा फोन लाँच करणार आहे.

मंगळवारी वनप्लसचे संस्थापक आणि सीईओ Pete Lau यांनी नव्या वनप्लसच्या फोनच्या नावाचा खुलासा केला. या फोनची किंमत 500 डॉलरपेक्षा कमी (जवळपास 37,700 रुपये) असेल. म्हणजे नवीन वनप्लस फोन OnePlus 8 सीरिजच्या तुलनेत स्वस्त असणार आहे. OnePlus 8 सीरिजच्या बेसिक मॉडेलची किंमत 699 डॉलर म्हणजे भारतात 41,999 रुपयांपासून सुरू होते. तर, नव्या वनप्लस फोनची किंमत 25 ते 37 हजारादरम्यान असू शकते. कंपनी लवकरच अ‍ॅमेझॉन इंडिया आणि OnePlus.in च्या वेबसाइटवर 100 नवीन OnePlus Nord फोनसाठी प्री-बुकिंगलाही सुरूवात करणार आहे. पण, नेमकी कधी प्री-बुकिंगला सुरूवात होईल याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

OnePlus Nord या नव्या फोनच्या प्रोटोटाइपची झलकही कंपनीकडून सादर करण्यात आली. यामध्ये ट्रिपल रिअर आणि ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप असल्याचं स्पष्ट झालं. वनप्लस नॉर्ड भारतात आणि युरोपात लाँच केला जाईल. कंपनीने अद्याप या फोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत माहिती दिलेली नाही. पण, या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765जी चिपसेटसह 6.55 इंच सुपर एमोलेड डिस्प्ले असू शकतो. फोनमधील ट्रिपल रिअर कॅमेऱ्याच्या सेटअपमध्ये 64-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असल्याची शक्यता आहे. याशिवाय 32-मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप असेल अशी चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 2:41 pm

Web Title: oneplus confirms its upcoming cheaper phones will be called nord pre orders to go live soon sas 89
Next Stories
1 फेसबुकवर आता बनवा स्वतःचा ‘अ‍ॅनिमेटेड अवतार’, आलं मजेशीर फीचर
2 Redmi Note 9 Pro Max खरेदी करण्याची पुन्हा संधी, ‘सेल’मध्ये आहेत शानदार ऑफर्स
3 करोना ट्रॅकर ‘आरोग्य सेतू’मध्ये तांत्रिक बिघाड, दोन तासांनी सेवा झाली पूर्ववत
Just Now!
X