News Flash

दर महिन्याच्या 17 तारखेला मिळणार शानदार ऑफर्स, ‘वनप्लस’ने केली Red Cable Day ची घोषणा

17 ऑगस्ट रोजी म्हणजे आज पहिला Red Cable Day ...

वनप्लस कंपनीने दर महिन्याच्या 17 तारखेला Red Cable Day ची घोषणा केली आहे. याद्वारे वनप्लसच्या ग्राहकांना विविध आकर्षक ऑफर्स देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीने डिसेंबर 2019 मध्ये ‘वनप्लस रेड केबल प्रोग्रॅम’ भारतात लाँच केला होता. त्यानंतर आज (दि.17) पहिला Red Cable Day आयोजित करण्यात आला आहे.

17 ऑगस्ट रोजी पहिल्या Red Cable Day अंतर्गत कंपनीकडून अनेक शानदार ऑफर्स आणि अतिरिक्त लाभ ग्राहकांना मिळतील. केवळ ‘वनप्लस रेड केबल क्लब’च्या सदस्यांनाच याचा लाभ घेता येईल. यानुसार, वनप्लसच्या सर्व अ‍ॅक्सेसरीजवर 5 टक्के डिस्काउंट , वनप्लस एक्सक्लूसिव्ह सर्व्हिस सेंटरवरुन स्पेयर पार्ट्स खरेदी करताना  15 टक्के डिस्काउंट आणि सर्व्हिस चार्जवर 100 टक्के सवलत मिळेल. या सदस्यांना वनप्लस एक्सक्लूसिव सर्व्हिस सेंटर्समध्ये होणाऱ्या ‘लकी ड्रॉ’मधूनही बेनिफिट्स मिळवता येतील.

कसा जॉइन करायचा ‘रेड केबल प्रोग्रॅम’ ?

यासाठी तुम्हाला वनप्लस डिव्हाइसमध्ये OxygenOS ला लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करावं लागेल. यानंतर फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन प्रोफाइल सेक्शनवर टॅप करताच युजर्सना वनप्लस अकाउंटमध्ये लॉग-इन करण्याचा पर्याय मिळेल. नंतर युजर्सना आपल्या डिव्हाइसचा IMEI नंबर वनप्लस अकाउंटसोबत लिंक करावा लागेल. याव्यतिरिक्त वनप्लसच्या कम्युनिटी अ‍ॅपद्वारेही ग्राहक याचा लाभ घेऊ शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 10:23 am

Web Title: oneplus launches red cable day exclusive offers every month on 17th check details sas 89
Next Stories
1 सॅमसंगच्या ‘स्वस्त’ स्मार्टफोनवर डिस्काउंट; किंमत फक्त 8,399 रुपये
2 Video : मुलांच्या स्क्रीनटाइमचं मॅनेजमेंट करताना…
3 सोरायसिस रुग्णांनी घ्या केसांची ‘ही’ खास काळजी
Just Now!
X