OnePlus Nord हा वन प्लस कंपनीचा ‘स्वस्त’ स्मार्टफोन आज (दि.21) अखेर लाँच होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वनप्लसचा हा फोन चर्चेत आहे. कारण या फोनसोबत कंपनी अनेक दिवसांनंतर मिड-रेंज सेगमेंटमध्ये पुनरागमन करणार आहे.

हा फोन वनप्लस 8 लाइट नावाने लाँच होईल अशी आधी चर्चा होती, नंतर वनप्लस Z नावाची चर्चाही रंगली पण अखेर हा फोन वनप्लस नॉर्ड नावाने आज संध्याकाळी 7.30 वाजता लाँच होईल. नवीन वनप्लस नॉर्ड हा “अ‍ॅफॉर्डेबल प्राइस सेगमेंट”मधला OnePlus चा पहिला फोन असणार आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये OnePlus ने किंमतीपेक्षा अनोख्या फीचर्सवर जास्त लक्ष दिलं होतं. 21 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 वाजता एका इव्हेंटमध्ये हा फोन लाँच केला जाईल.

काय असू शकतात फीचर्स :- 
OnePlus Nord या फोनमध्ये सेल्फीसाठी AI फेस डिटेक्शन फीचरसह ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. यातील मुख्य कॅमेरा 32 मेगापिक्सल क्षमतेचा तर दुसरा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा असेल. याशिवाय मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा क्वॉड कोर सेटअप मिळेल. यात 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 प्राइमरी कॅमेरा सेंन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अंगल कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि चौथा मॅक्रो सेन्सर असण्याची शक्यता आहे.  यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765 प्रोसेसर आणि दोन सेल्फी कॅमेरे असतील. याव्यतिरिक्त फोनच्या अन्य फीचर्सबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. OnePlus Nord  ची किंमत किती असेल याबाबत कंपनी लाँचिंग इव्हेंटमध्येच खुलासा करेल. पण, या फोनची किंमत 500 डॉलरपेक्षा कमी (जवळपास 37,700 रुपये) असू शकते. म्हणजे नवीन वनप्लस फोन OnePlus 8 सीरिजच्या तुलनेत स्वस्त असणार आहे. OnePlus 8 सीरिजच्या बेसिक मॉडेलची किंमत 699 डॉलर म्हणजे भारतात 41,999 रुपयांपासून सुरू होते. तर, नव्या OnePlus Nord ची किंमत 25 ते 37 हजारादरम्यान असू शकते.

अजून वाचा (‘सॅमसंग’चा स्वस्त Galaxy स्मार्टफोन भारतात झाला लाँच, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार दमदार फीचर्स)