OnePlus Nord स्मार्टफो एक हजार रुपयांच्या इस्टेंट डिस्काउंटवर खरेदी करण्याची संधी आहे. ICICI Bank क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ईएमआय ट्रांसजेक्शनद्वारे फोन खरेदी करणाऱ्यांना हा इस्टेंट डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. १४ सप्टेंबरपासून ही डिस्काउंट ऑफर अमेझॉनवर सुरु झाली आहे.या ई-कॉमर्स वेबसाइटवर तुम्हाला तीन महिन्यासाठी नो-कॉस्ट ईएमआईचा पर्यायही उपलबद्ध आहे. वन प्लसने गेल्या महिन्यात 21 जुलै रोजी आपला हा स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला. यासोबतच कंपनीने अनेक दिवसांनंतर ‘मिड-रेंज सेगमेंट’मध्ये पुनरागमन केलं.

OnePlus Nord ची किंमत –
OnePlus Nord च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत भारतीय बाजारपेठेत 24 हजार 999 इतकी आहे. तर, 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 27 हजार 999 रूपये आणि 29 हजार 999 रूपये इतकी आहे.

OnePlus Nord स्पेसिफिकेशन्स –
OnePlus Nord मध्ये सेल्फीसाठी 32+8 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये सोनी आयएमएक्स 616 सेन्सर आहे. तर, फोनच्या मागील बाजूला 48MP प्राइमरी कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. 48MP प्राइमरी कॅमेऱ्याशिवाय 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. वनप्लस नॉर्डमध्ये अल्ट्राशॉट एचडीआर, नाइटस्केप, सुपर मॅक्रो, पोर्ट्रेट, प्रो-मोड, पॅनोरमा, एआय सीन डिटेक्शन, RAW इमेज आणि अल्ट्रा वाइड सेल्फी यांसारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगचीही क्षमता आहे. ब्लू मार्बल आणि ग्रे ऑक्सी या दोन कलर्सचे पर्याय या फोनसाठी आहेत. ड्युअल-सिम कार्डचा सपोर्ट असलेला OnePlus Nord अँड्रॉइड 10 वर आधारित OxygenOS 10.5 वर कार्यरत आहे. यात 6.44 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) फ्लुइड एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765जी प्रोसेसर आणि 12 जीबीपर्यंत रॅम आहे. 184 ग्रॅम इतकं या फोनचं वजन असून फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4,115mAh क्षमतेची बॅटरी यामध्ये देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 802.11एसी, ब्लुटूथ 5.1, जीपीएस/ ए-जीपीएस, एनएफसी आणि युएसबी टाइप-सी पोर्ट यांसारखे फीचर्स आहेत.