स्मार्टफोन कंपनी OnePlus ने आपल्या युजर्ससाठी एक चॅलेंज दिलं आहे. हे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर त्यांना OnePlus चा स्मार्टफोन मोफत दिला जाईल. हे ऐकण्यास जितकं सोपं वाटतं तितकं नाहीये. हा स्मार्टफोन मोफत मिळवण्यासाठी तुम्हाला कंपनीची अँड्रॉइड आधारित ऑपरेटिंग सिस्टिम OxygenOS साठी नवे फीचर्स डिझाइन करावे लागतील.

युजर्सना सर्व फीचर्स सर्वप्रथम काळजीपूर्वक समजून घ्यावे लागतील. याशिवाय काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, तुमच्या उत्तरांनी आणि तुम्ही दिलेल्या आयडियामुळे कंपनीचं समाधान होणं आवश्यक आहे. तुमची आयडिया परिणामकारक ठरु शकते यावर कंपनीचा विश्वास बसायला हवा. इतकंच नाही तर जे फीचर डिझाइन तुम्ही बनवलं असेल ते स्मार्टफोनमध्ये कशापद्धतीने कार्यरत राहणार हे समजावण्यासाठी तुम्हाला एक चांगलं स्केच देखील काढावं लागेल.

त्यानंतर कंपनी काही फीचर्सची निवड करेल आणि त्या लकी युजर्सना वनप्लसच्या एका इव्हेटमध्ये सहभागी होता येईल. याच इव्हेंटमध्ये कंपनी निवडलेले फीचर अधिकृतरित्या लाँच करणार आहे. विजेत्याला मोफत वनप्लस स्मार्टफोन दिला जाईल, विशेष म्हणजे विजेत्याला जो स्मार्टफोन दिला जाईल त्यामध्ये त्यानेच डिझाइन केलेलं फीचर इनबिल्ट असणार आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत PRD (प्रॉडक्ट रिक्वॉयरमेंट डॉक्युमेंट) आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर देऊन हे चॅलेंज पूर्ण करणं गरजेचं आहे. हॅशटॅग #PMChallenge (येथे PM चा अर्थ प्रोडक्ट मॅनेजर असा आहे ) असं या चॅलेंजचं नाव असून forum.onplus.com या संकेतस्थळावर याबाबत सर्व माहिती उपलब्ध आहे.