News Flash

प्रतीक्षा संपली ! OnePlus7 आणि OnePlus7 Pro भारतात लाँच

पहिल्यांदाच डॉल्बी सपोर्टेड स्पीकर्स आणि कॅमेऱ्यातील गुगल लेन्सच्या सपोर्टमुळे कोणत्याही गोष्टीचा, वस्तूचा फोटो काढल्यानंतर त्याविषयी माहिती मिळणार

टेक जगतात अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे OnePlus7 आणि OnePlus7 Pro हे स्मार्टफोन अखेर लाँच झाले आहेत. एका इव्हेंटमध्ये भारतासह अमेरिका आणि युरोपात एकाच वेळी आणि एकाच दिवशी म्हणजे 14 मे रोजी रात्री 8.15 वाजता हे स्मार्टफोन लाँच करण्यात आले. हे दोन्ही उच्च श्रेणीतील स्मार्टफोन असून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करता येणार आहे. यावेळी पहिल्यांदाच वनप्लसच्या स्मार्टफोन्समध्ये डॉल्बी सपोर्टेड स्पीकर्स देण्यात आले आहेत. या फोनच्या कॅमेरामध्ये गुगल लेन्सचा सपोर्ट आहे. त्याच्या आधारे कोणत्याही गोष्टीचा, वस्तूचा फोटो काढल्यानंतर त्याच्याविषयी माहिती मिळवता येणार आहे.

यातील सर्वाधिक चर्चेत असलेला OnePlus 7 Pro हा स्मार्टफोन कंपनीने 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज , 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज आणि 12GB RAM आणि 256GB स्टोरेज अशा तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असणार आहे. 48 हजार 999 रुपये, 52 हजार 999 रुपये आणि 57 हजार 999 रुपये इतकी अनुक्रमे या तिन्ही व्हेरिअंट्सची किंमत आहे. वनप्लस 7 प्रो हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाय 9.0 या आवृत्तीपासून विकसीत करण्यात आलेल्या ऑक्सीजन ओएस 9.5 या आवृत्तीवर कार्यरत असणार आहे. या कॅमेऱ्याला ट्रिपल रिअर कॅमेऱ्याचा सेटअप आहे. त्यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असून त्याला 8 व 16 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यांची जोड आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 16 मेगापिक्सल वाइड अँगलने युक्त असणारा कॅमेरा आहे. फोनमध्ये 6.7 आकारमानाचा, क्युएचडी(3220 बाय 1440 पिक्सल) क्षमतेचा 19: 5:9 अॅस्पेक्ट रेशो असणारा व फ्युईड अमोलेड प्रकारातील डिस्प्ले आहे. हा वनप्लसच्या आतापर्यंतच्या फोन्समधील सर्वात चांगल्या दर्जाचा डिस्प्ले असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरचा वापर फोनसाठी करण्यात आला आहे. या मोबाईलची बॅटरी 4 हजार मिलिअँपिअर क्षमतेची असून केवळ 20 मिनिटात 48 टक्के चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे. तसेच हा फोन गरम होऊ नये यासाठी यामध्ये लिक्विड कुलिंग ही सिस्टिम वापरण्यात आली आहे.

वनप्लस 7 च्या फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये OnePlus 7 Pro बहुतांश फीचर्स आहेत पण यातील काही फीचर्स तुलनेने कमी दर्जाचे आहेत. डिस्प्लेचा आकार कमी अर्थात 6.41 इंच आहे. 6GB RAM आणि 128 GB इंटरनल स्टोरेज व 8GB RAM आणि 256 GB इंटरनल स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये हा फोन उपलब्ध असेल. अनुक्रमे 32 हजार 999 आणि 37 हजार 999 इतकी या दोन्ही व्हेरिअंट्सची किंमत आहे. फोनमध्ये मागील बाजूला ट्रिपलऐवजी ड्युअल कॅमेऱ्याचा सेटअप(48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल)असून सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर 3 हजार 700 मिलिअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 9:24 am

Web Title: oneplus7 and oneplus7 pro launched in india know price specifications
Next Stories
1 शाओमीने आणली ‘ही’ भन्नाट कल्पना
2 ‘हीरो’ची नवी स्कुटर, Pleasure Plus 110 भारतात लाँच
3 घरबसल्या बुक करा इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘चार्जिंग स्लॉट’ !
Just Now!
X