आता घरबसल्या आपल्या गाडीचा विमा काढू शकता. AGS ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजी आणि ग्लोबल-इंडिया इन्शुरन्स ब्रोकर्स (GIIB) यांनी आपल्या ONGO अँड्रॉईड पीओएस टर्मिनलवर डिजिटल मोटर इन्शुरन्स लाँच करण्यात आला आहे. यामुळे आता गाडीचा विमा काढणं आणखी सोपं झालं आहे. शिवाय हा विमा काढण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज नाही.

ONGO च्या या सुविधेमुळे वाहनांच्या मालकांना दुचाकी, चारचाकी वाहनांचा विमा अगदी सहजसाध्य ठिकाणांवर म्हणजेच इंधन रीटेल स्टेशन्स आणि स्थानिक/किराणा दुकानांमध्ये पूर्णपणे डिजिटाईज्ड आणि कागदविरहित माध्यमातून मिळवता येईल. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ONGO आणि जीआयआयबीमधील भागीदारीतून 5000 ONGO अँड्रॉईड पीओएस टर्मिनलच्या माध्यमातून सुमारे 25000 विमे पुरवण्यात येणार असल्याचं कंपीनं सांगितलेय.

जीडीपीच्या तुलनेत भारतातील विमा बाजारपेठ दरवर्षी दुपटीने वाढते आहे. मात्र तरीही, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत अजूनही पुरेशी विमा सेवा उपलब्ध नाही. आयबीईएफनुसार, दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांमधील ७० टक्के विमे आणि चारचाकींमधील ३० टक्के विमे मध्येच बंद पडतात. किचकट कागदपत्रे, तपासणीतील विलंब, विमा एजंटांची कमी उपलब्धता यामुळे ग्राहक विम्याचे नुतनीकरण करत नाहीत. मोटार विम्याची आवश्यकता आणि वेळेवर नुतनीकरणाची गरज याबद्दल जागरुकता नसणे, हेही एक कारण आहे. ONGO आणि जीआयआयबीच्या सहकार्यामुळे विमा जारी करण्याची प्रक्रिया ऑनलाइन तपासणीमुळे सोपी झाली आहे आणि त्यामुळे मान्यता मिळण्याचा कालावधी काही दिवसांवरून काही मिनिटांपर्यंत आला आहे.

याची ठळक वैशिष्ट्ये :

काही मिनिटांत मिळणार गाडीचा इन्श्योरेंसपॉलिसी,

ग्राहकांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी जसे की इंधन रीटेल स्टेशन्स, किराणा स्टोअर्स अशा ठिकाणांहून किंवा क्रेडिट/डेबिट कार्ड व्यवहारांच्या माध्यमातून ONGO मर्चंटकडून नवी पॉलिसी विकत घेता येईल, आधीच्या पॉलिसीचे नुतनीकरण करता येईल

एपीआय इंटिग्रेशनच्या माध्यमातून अंडररायटिंग आणि प्रीमिअम किती हे जाणून घेणे शक्य होते.

कागदविरहित आणि डिजिटल विमा प्रक्रिया, कमीत कमी कागदपत्रे. गाडीचा नवा विमा घ्यायचा असेल तर फक्त डीलरने दिलेले विक्री पत्र आणि आधीच्या/बंद पडलेल्या विम्याचे नुतनीकरण करण्यासाठी जुन्या विम्याची कॉपी किंवा आरसीची कॉपी इतकीच कागदपत्रे आवश्यक

पॉलिसी रद्द करणे किंवा एंडोर्समेंट ऑनलाइन शक्य

क्लेम किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी भागीदार इन्शुरन्स कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहक सेवा पुरवली जाते किंवा जीआयआयबीचे हेल्पडेस्क उपलब्ध आहे तसेच ग्राहकांना नजीकच्या कॅशलेस गॅरेजशी संपर्क साधता येईल.