News Flash

ठरलं तर! ‘या’ तारखेपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार iPhone SE 2020 ची विक्री

फ्लिपकार्टनं याबाबत माहिती दिली आहे.

गेल्या महिन्यात Apple कंपनीने आपला ‘स्वस्त’ iPhone SE 2020 लाँच केला. कमी किंमतीमुळे चर्चेत असलेला हा फोन लाँच करतेवेळी कंपनीने तो भारतात कधी उपलब्ध होईल आणि त्याची विक्री कधीपासून सुरू होईल याबाबत माहिती दिली नव्हती. पण आता या आयफोनबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. फ्लिपकार्टवर २० मे पासून या फोनची विक्री सुरू करण्यात येणार आहे. २० मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून या फोनच्या सेलला सुरूवात होणार आहे. या नव्या आयफोनची किंमत ४२ हजार ५०० रूपये असेल. तसंच हा आतापर्यंतचा स्वस्त आयफोन असल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.

फ्लिपकार्टवर यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. तसंच फ्लिपकार्टनं दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड युझरला ३ हजार ६०० रूपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. तसंच या ऑफरअंतर्गत एचडीएफसी क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना तो फोन ३८ हजार ९९९ रूपयांना मिळणार आहे.

यापूर्वी फ्लिपकार्टवर ‘कमिंग सून’ अशा बॅनरखाली हा फोन फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला होता. तसंच फ्लिपकार्टने फोन खरेदीसाठी इच्छुक ग्राहकांचे रजिस्ट्रेशनही सुरू केलं होतं. भारतात विक्री नेमक्या कोणत्या तारखेपासून सुरू होणार याबाबत मात्र घोषणा करण्यात आली नव्हती. पण, फ्लिपकार्टने Notify Me हे पेज सुरू केल्यामुळे iPhone SE ची लवकरच भारतात विक्री सुरू होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. परंतु आता २० मे पासून या फोनची विक्री सुरू करण्यात येणार आहे.

iPhone SE 2020 हा सर्वात स्वस्त iPhone असल्याचा दावा कंपनीनं केला असला तरी त्याची सुरूवातीची किंमत ६४ जीबीच्या व्हेरिअंटसाठी ४२ हजार ५०० रूपये आहे. कंपनीनं हा फोन ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध केला आहे. सध्या अन्य व्हेरिअंटच्या भारतातील किंमतीबाबत मात्र कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही. नव्या आयफोनमध्ये सिंगल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. F/१.८ सह १२ मेगापिक्सेलचा हा कॅमेरा असून याद्वारे 4के व्हिडीओही शूट करता येणार आहे. तर सेल्फीसाठी यामध्ये ७ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यासोबतच यात एचडीआर आणि पोर्टेटसारखेही फिचर्स आहेत. ब्लॅक, व्हाईट आणि (प्रोडक्ट) रेड या रंगांच्या पर्यायात नवीन आयफोन उपलब्ध असेल.

iPhone SE 2020 मध्ये ४.७ इंचाचा रॅटिना HD IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यामध्ये आयफोनच्या अत्याधुनिक A13 Bionic chip चा वापर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या मोबाइलमध्ये डॉल्बी व्हिजन आणि HDR10 चा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G VoLTE, वायफाय 802.11ax, वायफाय कॉलिंग, NFC, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS देण्यात आलं आहे. तसंच यामध्ये टच आयडी बटणही आहे. iPhone SE 2020 चा लुक iPhone 8 प्रमाणेच आहे. तसंच हा फोन IP67 रेटिंगसह येतो. त्यामुळे हा फोन डस्ट आणि वॉटर रेझिस्टंटदेखील आहे. फोनची संपूर्ण बॉडी ग्लास आणि एअरोस्पेस ग्रेड अ‍ॅल्युमिनिअमपासून बनली आहे. तसंच फोनमध्ये वायरलेस चार्जिंगचाही पर्याय देण्यात आला आहे. फास्ट चार्जिंगसह केवळ अर्ध्या तासात हा फोन ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 1:33 pm

Web Title: online e commerce flipkart will start iphone se 2020 sell from 20th may jud 87
Next Stories
1 Xiaomi च्या शानदार ‘बजेट’ स्मार्टफोनचा ‘सेल’, मिळेल एक हजार रुपयांचे डिस्काउंटही
2 Aarogya Setu App : लाँचिंगनंतर 41 दिवसांमध्येच गाठला मोठा टप्पा
3 रेषाचक्र : हातावर ‘ही’ रेषा असेल, तर लवकरच व्हाल श्रीमंत
Just Now!
X