Oppo कंपनीने A सीरिजमधला आपला नवीन स्मार्टफोन Oppo A92 आणला आहे. यापूर्वी कंपनीने A सीरिजमधील Oppo A52 हा फोनही लॉन्च केला आहे.

फीचर्स :-
Oppo A92 मध्ये कंपनीने स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरसह दमदार बॅटरी दिली आहे. होल-पंच डिझाइनसह या फोनमध्ये 6.5 इंच फुलएचडी+ डिस्प्ले असेल. कंपनीने हा स्मार्टफोन केवळ 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध केला आहे. अँड्रॉइड 10 वर आधारित हा नवीन स्मार्टफोन कलर ओएस 7.1 वर कार्यरत असेल. या फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स असून दर्देजार साउंड क्वालिटीसाठी Dirac Stereo 2.0 साउंड इफेक्ट आहे. याशिवाय या फोनमध्ये 5,000 एमएएच क्षमतेची फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली दमदार बॅटरीही देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 48-मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आहे. याशिवाय अन्य दोन कॅमेरे 2- मेगापिक्सलचे आहेत. Oppo A92 वर एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आले आहे.

किंमत :-
Oppo A92 हा फोन ट्विलाइट ब्लॅक आणि शायनिंग व्हाइट कलर व्हेरिअंटमध्ये मिळेल. पण, हा फोन कंपनीने मलेशियामध्ये लॉन्च केला. मात्र लवकरच भारतातही हा फोन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नवीन ओप्पो ए92 ची किंमत 1,199 MYR (भारतीय चलनानुसार जवळपास 21 हजार रुपये) आहे.