ओप्पो कंपनीने आपल्या अनेक स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने आपल्या चार शानदार फोनच्या किंमती कमी केल्यात. यामध्ये ओप्पो A12, ओप्पो A15, ओप्पो F17 आणि ओप्पो Reno 3 Pro या चार फोन्सचा समावेश आहे. याशिवाय दोन दिवसांपूर्वीच कंपनीने आपल्या Oppo A33 या गेल्या महिन्यातच लाँच केलेल्या फोनच्या किंमतीतही एक हजार रुपयांची कपात केली आहे.

फोनच्या किंमतीत कपात झाल्याबाबत ओप्पोकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, महेश टेलिकॉमने किंमतीत किंमतीत कपात करण्यात आल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. त्यानुसार, कंपनीच्या A सीरिजमधील स्मार्टफोन ओप्पो A12 आणि ओप्पो A15 यांच्या किंमतीत एक हजार रुपयांची कपात झाली आहे. तर, नुकत्याच लाँच झालेल्या ओप्पो F17 या फोनच्या 8 जीबी रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिअंटची किंमतही 500 रुपयांनी कमी झालीये. याशिवाय, ओप्पो Reno 3 Pro या फोनच्या 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत एक हजार रुपये आणि 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत दोन हजार रुपयांची कपात झाली आहे.

किती आहे नवीन किंमत ?
-ओप्पो A12 (3GB+32GB)- नवीन किंमत 8 हजार 990 रुपये (कपात 1,000 रुपये)
-ओप्पो A15 (2GB+32GB)- नवीन किंमत 8 हजार 990 रुपये (कपात 1,000 रुपये)
-ओप्पो A15 (3GB+32GB)- नवीन किंमत 9 हजार 990 रुपये ( कपात 1,000 रुपये)
-ओप्पो F17 (8GB+128GB)- नवीन किंमत 18 हजार 490 रुपये ( कपात 500 रुपये)
-ओप्पो Reno 3 Pro (8GB+128GB)- नवीन किंमत 24 हजार 990 रुपये (कपात 1,000 रुपये)
-ओप्पो Reno 3 Pro (8GB+256GB)- नवीन किंमत 27 हजार 990 रुपये ( कपात 2,000 रुपये)
-ओप्पो A33 (3GB+32GB) – नवीन किंमत 10 हजार 990 रुपये ( कपात 1,000 रुपये)