ओप्पो कंपनीचा नवीन स्मार्टफोन Oppo A33 आता स्वस्त झाला आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. Oppo A33 हा फोन गेल्या महिन्यातच 11,990 रुपये किंमतीत लाँच करण्यात आला होता. पण, आता कंपनीने या फोनच्या किंमतीत एक हजार रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे Oppo A33 हा फोन आता 10,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Oppo A33 हा स्मार्टफोन नव्या किंमतीसह ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्टवरुनच फोनच्या नव्या किंमतीचा खुलासा झाला आहे. अद्याप ओप्पो कंपनीने मात्र याबबात अधिकृत घोषणा केलेली नाही.

Oppo A33 स्पेसिफिकेशन्स :-
ओप्पो ए33 स्मार्टफोन मूनलाइट ब्लॅक आणि मिंट क्रीम कलर अशा दोन पर्यायांमध्ये येतो. या बजेट स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसोबत 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 460 ऑक्टा-कोर प्रोसेसरसोबत 3 जीबी रॅम मिळेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर आधारित कलर ओएस 7.2 ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असतो. ओप्पोच्या या फोनच्या मागील बाजूला तीन कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यात 13 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेऱ्यासोबत 2 मेगापिक्सेलचे अन्य दोन सेन्सर आहेत. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूला 8 मेगापिक्सेलचा कॅमेराही आहे. Oppo A33 स्मार्टफोन 32 जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. माइक्रो-एसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर हे फिचर देण्यात आलं आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पीकर्सही आहेत. तर, कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5, युएसबी टाइप-सी पोर्ट, वाय-फाय असे अनेक फिचर्स आहेत.