Oppo कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Oppo A52 भारतात लाँच केला आहे. ओप्पोचा हा बजेट स्मार्टफोन दोन रंगात उपलबद्ध आहे. १७ जून पासून या स्मार्टफोनची भारतात ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्री सुरू होणार आहे. या फोनच्या मागील बाजूला चार कॅमेरे आहेत. यातील सिंगल सेल्फी कॅमेरा होल-पंच डिस्प्लेमध्ये सेट करण्यात आलाय. 5,000 एमएएच क्षमतेची पावरफुल बॅटरी असलेल्या या फोनमध्ये हायपरबूस्ट टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात हा स्मार्टफोन सर्वात आधी चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे.

किंमत –
६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १६ हजार ९९० रुपये आहे. सध्या एकाच व्हेरिएंटचा फोन लाँच करण्यात आला असून कंपनीने लवकर ४ जीबी आणि ८ जीबी व्हेरिएंटचा फोन लाँच करू असे सांगितले आहे. या फोनच्या किंमतीमध्येही त्यांनी गुप्तता बाळगली आहे.

स्पेसिफिकेशन्स –
ओप्पो ए52 Android 10 वर आधारित ColourOS 7.1 वर कार्यरत असेल. यामध्ये 6.5 इंच (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले असून ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 665 चिपसेट आहे. तर, 8 जीबी LPDDR4x रॅम असलेल्या या फोनमध्ये मागील बाजूला क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यात प्रायमरी कॅमेऱ्यात 12-मेगापिक्सल सेंसर आणि सेकंडरीमध्ये 8-मेगापिक्सल सेंसरचा समावेश आहे. फ्लॅशसह हे चार कॅमेरे आयताकार कॅमेरा मॉड्यूलमध्ये सेट करण्यात आले आहेत. अन्य दोन कॅमेरे 2-मेगापिक्सलचे सेंसर आहेत. तर फ्रंटमध्ये एक 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये वाय-फाय, एलटीई, ब्लूटूथ, एक 3.5 मिलिमीटर हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी युएसबी टाइप-सी पोर्ट आहेत. याशिवाय, 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी यात आहे. 192 ग्रॅम वजन असलेला या फोनला साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे, म्हणजे सेंसर पावर बटणमध्ये फिट करण्यात आले आहे.