News Flash

2,500 रुपयांनी स्वस्त झाला 5000mAh बॅटरीचा शानदार Oppo A53, जाणून घ्या डिटेल्स

Oppo A53 स्मार्टफोनमध्ये होल-पंच डिस्प्ले डिझाइन आणि ग्रेडिअंट बॅकपॅनल

ओप्पो कंपनीचा A सीरिजमधील दमदार स्मार्टफोन Oppo A53 आता स्वस्त झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच झालेल्या दमदार Oppo A53 ची किंमत आता अडीच हजार रुपयांनी कमी झाली आहे. Oppo A53 स्मार्टफोन होल-पंच डिस्प्ले डिझाइन आणि ग्रेडिअंट बॅकपॅनल डिझाइनसोबत येतो. Oppo A53 हँडसेटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, ऑक्टा-कोर प्रोसेसर, रिअर फिंगरप्रिंट सेन्सर आणि 18 W फास्ट चार्जिंगसह दमदार बॅटरी यांसारखे शानदार फीचर्स आहेत. Oppo च्या या लेटेस्ट स्मार्टफोनची रिअलमी 6, सॅमसंग गॅलेक्सी M31 आणि रेडमी नोट 9 प्रो यांसारख्या स्मार्टफोनसोबत टक्कर असेल.

Oppo A53 स्पेसिफिकेशन्स :-
Oppo A53 2020 अँड्रॉइड 10 वर आधारित कलर ओएस 7.2 वर कार्यरत आहे. यामध्ये 6.5-इंच एचडी+ (1,600×720 पिक्सल) डिस्प्ले (90 Hz रिफ्रेश रेट) आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर असून 4 जीबी व 6 जीबी रॅमचे दोन पर्याय मिळतील. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (16MP + 2MP + 2MP) आहे. याशिवाय सेल्फीसाठी पुढील बाजूला एक 16-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा कॅमेरा होल-पंच अटआउटच्या आतमध्ये सेट करण्यात आला आहे. Oppo A53 मध्ये 64 जीबी/ 128 जीबी स्टोरेज आहे. माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी असून ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. तर, फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलं आहे.

किंमत :-
91 मोबाइल्सच्या रिपोर्टनुसार, Oppo A53 च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत दोन हजार रुपयांची कपात झाली आहे. तर, 6 जीबी रॅम/128 स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत अडीच हजार रुपयांची कपात झाली आहे. किंमतीतील कपातीनंतर दोन्ही मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 10 हजार 990 रुपये आणि 12 हजार 900 रुपये झाली आहे. हा फोन डायनेमिक ग्रे आणि फ्रॉस्टेड शँम्पेन अशा दोन रंगांच्या पर्यायंमध्ये खरेदी करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 12:28 pm

Web Title: oppo a53 price in india slashed by up to rs 2500 check details sas 89
Next Stories
1 सर्वात स्वस्त Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसरचा स्मार्टफोन Moto G40 Fusion, आज पहिलाच ‘सेल’
2 आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदी वाढवली, करोनाचा धोका वाढल्याने DGCA चा निर्णय
3 Hyundai ची सर्वात स्वस्त कार झाली महाग, Santro प्रेमींना बसला झटका
Just Now!
X