News Flash

चार कॅमेऱ्यांचा Oppo A9 2020 झाला स्वस्त, किंमतीत झाली भरघोस कपात

ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही मार्केटमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध...

(Oppo A9 2020)

ओप्पो कंपनीने आपल्या Oppo A9 2020 या स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस कपात केली आहे. कंपनीने  Oppo A9 2020 हा स्मार्टफोन गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केला होता. या फोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या (4GB रॅम) किंमतीत तीन हजार रुपयांची  कपात झाली आहे. मरीन ग्रे,  व्हॅनिला मिंट आणि स्पेस पर्पल अशा तीन कलरमध्ये उपलब्ध असलेल्या या फोनच्या 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत मात्र बदल झाला नसल्याचं समजतंय. ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही मार्केटमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे.

फीचर्स :- Oppo A9 2020 या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले असून 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज मिळतो. माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 GB पर्यंत वाढवता येणं शक्य आहे. ओप्पोचा हा फोन Android v9.0 (Pie) ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असतो. यामध्ये 5000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ओप्पो A9 2020 मध्ये मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यातील मुख्य कॅमेरा 48MP क्षमतेचा, तर अन्य कॅमेरे अनुक्रमे 8MP , 2MP आणि 2MP क्षमतेचे आहेत. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय.

किंमत :- कंपनीचा हा फोन आता तीन हजार रुपयांनी स्वस्त झालाय. या फोनच्या 4GB रॅम व्हेरिअंटची किंमत आता 12 हजार 990 रुपये झाली आहे. तर, 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत मात्र बदल झालेला नाही. त्यामुळे या व्हेरिअंटची किंमत 18,990 रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 2:05 pm

Web Title: oppo a9 2020 gets rs 3000 price cut in india get new price and all details sas 89
Next Stories
1 Vodafone च्या प्रीपेड युजर्ससाठी भन्नाट ऑफर, ‘या’ प्लॅनवर मिळतोय फ्री 5GB एक्स्ट्रा डेटा
2 तातडीने डिलीट करा ‘हे’ 47 अ‍ॅप्स, गेमच्या नावाखाली देतायेत धोका
3 Reliance Jio चा नवीन प्लॅन, 222 रुपयांमध्ये फ्री Disney+ Hotsar VIP चं सबस्क्रिप्शन
Just Now!
X