18 January 2021

News Flash

चार कॅमेऱ्यांचा Oppo A9 2020 स्मार्टफोन झाला स्वस्त, ‘ही’ आहे नवी किंमत

Oppo A9 2020 या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात

ओप्पो कंपनीने आपल्या Oppo A9 2020 या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांच्या संकेतस्थळांवर हा फोन नव्या किंमतीमध्ये उपलब्ध आहे.

फीचर्स :- Oppo A9 2020 या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले असून 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज मिळतो. माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 GB पर्यंत वाढवता येणं शक्य आहे. ओप्पोचा हा फोन Android v9.0 (Pie) ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असतो. यामध्ये 5000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ओप्पो A9 2020 मध्ये मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यातील मुख्य कॅमेरा 48MP क्षमतेचा, तर अन्य कॅमेरे अनुक्रमे 8MP , 2MP आणि 2MP क्षमतेचे आहेत. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय.

आणखी वाचा- गेमर्ससाठी संधी! POCO X2 स्मार्टफोनचा आज सेल, ‘या’ आहेत ऑफर

किंमत :- कंपनीचा हा फोन आता एक हजार रुपयांनी स्वस्त झालाय. या फोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत आता 17 हजार 490 रुपये झाली आहे. तर, 4GB RAM + 128GB व्हेरिअंट आता 14 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन 15 हजार 990 रुपयांच्या बेसिक किंमतीसह लाँच करण्यात आला होता. तर, लाँचिंगवेळी 8GB व्हेरिअंटची किंमत 18 हजार 990 रुपये होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 11:25 am

Web Title: oppo a9 2020 smartphone price cut know new price specifications and all other details sas 89
Next Stories
1 गेमर्ससाठी संधी! POCO X2 स्मार्टफोनचा आज सेल, ‘या’ आहेत ऑफर
2 साबणातील रसायनांमुळे बालकांना श्वसनाचे विकार
3 Jio चे दोन स्वस्त प्लॅन, फ्री कॉलिंगसोबत 7 जीबीपर्यंत डेटाही
Just Now!
X