मार्व्हलच्या ‘अॅव्हेंजर्स: एंडगेम’ चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. तरुण वर्गामध्ये या चित्रपटाबाबात असलेलं क्रेझ पाहून स्मार्टफोन निर्माती कंपनी ‘ओप्पो’ने ‘ओप्पो एफ 11 अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा स्पेशल स्मार्टफोन लाँच केला आहे.

केवळ अॅमेझॉनवर या स्मार्टफोनची विक्री होणार असून फोनचा मर्यादित साठा विक्रीसाठी असणार आहे. स्पेशल अॅव्हेंजर्स एडिशनच्या ग्लॉसी फिनीश डिझाइनसह सादर करण्यात आला असून फोनच्या मागील बाजूस निळा रंगाचा पॅटर्न आहे आणि लाल रंगाचा अॅव्हेंजर्स लोगो आहे.

या नव्या स्मार्टफोनची भारतातील किंमत आणि फीचर्स –
27 हजार 990 रुपये इतकी या लिमिटेड एडिशन स्मार्टफोनची भारतात किंमत ठरवण्यात आली असून अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर हा स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. 1 मे पासून या स्मार्टफोनची विक्री सुरू होईल. स्मार्टफोनसह कॅप्टन अमेरिकातून प्रेरित निळ्या रंगाचं प्रोटेक्टिव्ह कव्हर मिळेल. हा लिमिटेड एडिशन स्मार्टफोन अॅव्हेंजर्स-थीम वॉलपेपरसह उपलब्ध असेल. ग्राहकांना या फोनसह ‘कॅप्टन अमेरिका शिल्ड’ असलेला एक स्मार्टफोनकेस मिळणार आहे. ही शिल्ड बाहेरच्या बाजूला खेचून त्याचा उपयोग स्टँडसारखा करता येऊ शकतो.

-6.5इंचाचा एचडी प्लस पॅनारोमिक डिस्प्ले
-पी 70 ऑक्टा-कोर प्रोसेसर
– 6 जीबी रॅम, 128 जीबी इंटर्नल मेमरी आहे. मायक्रो एसडी कार्डच्या आधारे ही मेमरी 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. –
– 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा
-रिअर कॅमेरा 48 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सल सेकेंडरी ड्यूअल कॅमेरा
– बॅटरीची क्षमता 4020 एमएएच