मोबाईल कंपन्या दिवसागणिक बाजारात नवनवीन स्मार्टफोन बाजारात दाखल करतात. या स्पर्धेत सध्या शाओमी, सॅमसंग, लावा, नोकीया, सोनी यांसारख्या अनेक कंपन्या आहेत. यामध्ये आणखी एका कंपनीने उडी घेतली आहे. Oppo या कंपनीचा फोन कॅमेरासाठी प्रसिद्ध असून कमी कालावधीत कंपनीने भारतात आपले स्थान निर्माण केले आहे. लवकरच Oppo F11 Pro हा फोन कंपनी लाँच करत असून हा फोन Oppo F 9 ची पुढची आवृत्ती आहे. हा फोन मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लाँच होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

Oppo F11 Pro चे फिचर्स

६.५ इंचांचा एलसीडी डिस्प्ले

ड्युएल कॅमरा सेटअप

फिंगर प्रिंट सेन्सर

पॉप-अप सेल्फी कॅमेरा

४८ मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर तर १२ मेगापिक्सेलचा सेंकडरी सेन्सर

फोनची मेमरी ६ जीबीची

इंटरनल स्टोरेज १२८ जीबी

हायएंड मीडियाटेक चीपसेट

किंमत साधारण २५०००