स्मार्टफोन कंपनी Oppo ने काही दिवसांपूर्वीच भारतीय मार्केटमध्ये आपली लेटेस्ट ओप्पो एफ19 सीरिज लाँच केली. या सीरिजमध्ये कंपनीने Oppo F19 Pro+ आणि Oppo F19 Pro हे दोन स्मार्टफोन आणले असून दोन्ही स्मार्टफोनला भारतीयांचा जबरदस्त प्रतिसाद मिळालाय. लाँचिंगनंतर पहिल्या सेलच्या सुरूवातीच्या तीन दिवसांमध्येच कंपनीने भारतात एफ19 सीरिजच्या तब्बल २३०० कोटी रुपयांच्या फोन्सची विक्री केली आहे. ओप्पोकडून बुधवारी याबाबत माहिती देण्यात आली. सेलच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या विक्रीने यापूर्वीच्या सर्व ओप्पो फोनच्या विक्रीचा विक्रम मोडल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं. ओप्पो एफ19 सीरिजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप, सुपर एमोलेड डिस्प्ले, फिंगरप्रिंट सेन्सर यांसारखे फिचर्स आहेत. शिवाय, प्रो प्लस व्हेरिअंटमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट, तर प्रो मॉडेल 4जी व्हेरिअंटमध्ये आहे. जाणून घेऊया दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत :

Oppo F19 Pro+ स्पेसिफिकेशन्स :-
डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर: ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला ओप्पो एफ19 प्रो+ स्मार्टफोन Android 11 वर आधारित कलरओएस 11.1 वर कार्यरत असेल. फोनमध्ये 6.4 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सेल) सुपर एमोलेड डिस्प्ले आणि प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा सपोर्ट आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेंसिटी 800यू ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 8 जीबी LPDDR4X रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. शिवाय माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4 जी एलटीई, 5G, ब्लूटूथ व्हर्जन 5.1, वाय-फाय 802.11एसी, जीपीएस/ए-जीपीएस, 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही मिळेल. तसेच फोनच्या मागील बाजूला क्वॉड रिअर कॅमेरा सेअटप (48MP + 8MP + 2MP + 2MP) आहे. फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्यात अनेक मोड असून सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सरही आहे. फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4310 mAh क्षमतेची बॅटरी फोनमध्ये मिळते.

आणखी वाचा- OnePlus 9 सीरिज भारतात लाँच, कंपनीने OnePlus Watch देखील आणलं; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Oppo F19 स्पेसिफिकेशन्स :-
ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला ओप्पो एफ19 प्रो स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारित कलरओएस 11.1 वर कार्यरत आहे. फोनमध्ये 6.43 इंचाचा एमोलेड डिस्प्ले असून 8 जीबी रॅम आणि 256 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4310 एमएएच क्षमतेची बॅटरीही आहे. तसेच, या फोनच्या मागील बाजूलाही क्वॉड रिअर कॅमेरा सेअटप (48MP + 8MP + 2MP + 2MP) आहे. तर, फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्यात अनेक मोड असून सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सरही आहे. शिवाय, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात मीडियाटेक हीलियो पी95 4जी चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.

आणखी वाचा- 108MP कॅमेरा क्षमतेच्या Redmi Note 10 Pro Max चा ‘सेल’, जाणून घ्या किंमत आणि खासियत

किंमत :-
ओप्पो एफ19 प्रो प्लसच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 25 हजार 990 रुपये आहे. तर, F19 Pro च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 21 हजार 490 रुपये आहे व टॉप व्हेरिअंट 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजची किंमत 23 हजार 490 रुपये आहे. फ्लुइड ब्लॅक आणि स्पेस सिल्वर अशा दोन पर्यायांमध्ये हे दोन्ही स्मार्टफोन उपलब्ध आहेत.