ओप्पो कंपनीने मंगळवारी नवी दिल्लीमध्ये आयोजीत एका कार्यक्रमात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन एफ9 प्रो हा लॉन्च केला. ओप्पो एफ9 प्रो मध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 3500 एमएएच बॅटरी आहे. याशिवाय फोनमध्ये 6.3 इंच फुल एचडी डिस्प्ले + वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, 25 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा यांसारखे अनेक फिचर्स आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Oppo F9 Pro ची किंमत आणि ऑफर्स –
Oppo F9 सनराइज रेड, ट्विलाइट ब्ल्यू आणि स्टारी पर्पल कलरमध्ये मिळेल. कंपनीने या फोनच्या 6 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 23 हजार 990 रुपये ठेवली आहे. 31 ऑगस्टपासून या फोनची विक्री सुरू होत असून त्यासाठी प्री-बूकिंगला सुरूवात झाली आहे. फ्लिपकार्ट, पेटीएम आणि अॅमेझॉन इंडिया याशिवाय देशभरातील ऑफलाइ स्टोअरमधूनही फोन खरेदी करता येईल. हा फोन खरेदी केल्यास रिलायन्स जिओकडून 305 टीबी डेटाची ऑफर असून मेकमायट्रीप आणि जिओकडून 4 हजार 900 रुपयांपर्यंतची ऑफर दिली जात आहे. तसंच एसबीआयच्या कार्डने खरेदी केल्यास 5 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

Oppo F9 Pro स्पेसिफिकेशन्स –
ओप्पो एफ9 प्रो मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. स्पेसिफिकेशन्सबाबत बोलायचं झालं तर, यामध्ये 6.3 इंच फुल एचडी डिस्प्ले (रिझोल्युशन 1080×2280 पिक्सल ) डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग ग्लास, ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी60 प्रोसेसर, अॅन्ड्रॉइड 8.1 ओरियो ऑपरेटिंग सिस्टिम आहे. तर 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज असलेल्या या फोनचं स्टोरेज मायक्रोएसडीकार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकेल.

डिस्प्ले – 6.30 इंच
प्रोसेसर – 2GHz ऑक्टा-कोर
फ्रंट कॅमेरा – 25 मेगापिक्सल
रिझोल्यूशन – 1080×2340 पिक्सल
रॅम – 6GB
ऑपरेटिंग सिस्टिम – Android Oreo
स्टोरेज – 64 जीबी
रिअर कॅमेरा – 16 मेगापिक्सल + 2 मेगापिस्कल
बॅटरी – 3500 mAh

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppo f9 pro launch in india
First published on: 22-08-2018 at 10:44 IST