10 April 2020

News Flash

Oppo च्या शानदार फोन्सवर सात हजाराची सवलत, 13 फेब्रुवारीपर्यंत ऑफर

कंपनीकडून ऑफर

ओप्पो कंपनीकडून Oppo Fantastic Days सेलची सुरूवात 10 फेब्रुवारीपासून झाली असून 13 फेब्रुवारीपर्यंत हा सेल सुरू असेल. Amazon च्या संकेतस्थळावर सुरू असलेल्या या सेलमध्ये ग्राहक ओप्पो (Oppo) चे अनेक शानदार स्मार्टफोन सात हजार रुपयांच्या सवलतीसह खरेदी करु शकतात. याशिवाय सेलमध्ये EMI चा पर्यायही असून याअंतर्गत दर महिन्याला किमान 1,415 रुपयांच्या EMI वर फोन खरेदी करता येईल. जाणून घेऊया कोणत्या फोनवर किती सवलत आहे…

पाहा फोटो –  (पैसा वसूल ठरणारे आठ ‘बेस्ट’ स्मार्टफोन, किंमत १५ हजारांहून कमी)

Oppo च्या 48 मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या F11 हा फोन 23 हजार 990 रुपयांऐवजी केवळ 13 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय ओप्पो F11 हा फोन 2,332 रुपयांच्या EMI वर घरी घेऊन जाऊ शकतात. या फोनमध्ये 4020mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

सेलमध्ये Oppo A9 हा फोन 16 हजार 990 रुपयांऐवजी केवळ 11 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 1,998 रुपयांच्या EMI वरही खरेदी करता येईल.

Oppo F15 या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सल AI कॅमेरा आहे. हा फोन 22 हजार 990 रुपयांऐवजी 19 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय ओप्पो A7 हा स्मार्टफोन 16 हजार 990 रुपयांऐवजी अर्ध्या किंमतीत म्हणजे केवळ 8 हजार 990 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकतात.

आणखी वाचा – Xiaomi ने लाँच केला स्वस्त फोन, मिळेल ‘ढासू’ कॅमेरा आणि 5000 mAh ची दमदार बॅटरी

Oppo A5 या फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंगसारखे फीचर्स आहेत. हा फोन ग्राहकांना 14 हजार 990 रुपयांऐवजी केवळ 11 हजार 490 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, ओप्पो A9 हा फोन 18 हजार 990 रुपयांऐवजी 15 हजार 990 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Oppo Reno (10x zoom) हा स्मार्टफोन 7000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. सवलतीनंतर हा फोन 32 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 10:59 am

Web Title: oppo fantastic days sale on amazon discount upto 7 thousand rupees on oppo phones sas 89
Next Stories
1 Xiaomi ने लाँच केला स्वस्त फोन, मिळेल ‘ढासू’ कॅमेरा आणि 5000 mAh ची दमदार बॅटरी
2 Dessert Recipes for Valentine’s Day : रिच चॉकलेट स्ट्रॉबेरी ब्राउनी
3 Dessert Recipes for Valentine’s Day : स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री
Just Now!
X