चीनची कंपनी असलेल्या Oppo कंपनीने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Oppo K1 असे या फोनचे नाव असून त्याबरोबरच ओप्पोची एक नवीन सिरीज लाँच झाली आहे. हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला असून त्याठिकाणी त्याची किंमत रुपयांमध्ये १७,१०० रुपये आहे. तर भारतात त्याची किंमत १६,९९९ रुपये आहे. हा फोन चीनमध्ये ऑक्टोबर २०१८ मध्ये लाँच केला गेला होता. तर आता तो भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनला ६.४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आला आहे.

हा मोबाईल १२ फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवरुन खरेदी करता येणार आहे. हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येणार आहे. सिटी बँकच्या डेबिट कार्डवर हा फोन खरेदी केल्यास १० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. हा फोन आता पियानो ब्लॅक आणि निळ्या रंगात लाँच करण्यात आला असून प्रोटेक्शनसाठी या फोनला गोरिल्ला ग्लास लावण्यात आली आहे. यामध्ये २५ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून १६ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा डुअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ४ जीबी आणि ६ जीबी रॅम असलेले दोन व्हेरियंट देण्यात आले आहेत. या दोन्हीची मेमरी २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.