17 July 2019

News Flash

केवळ 10 मिनिटात 40 टक्के चार्जिंग, Oppo R17 Pro आज होणार लाँच

पहिलाच असा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये सुपर VOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलजीचा वापर

Oppo कंपनी आपल्या R सीरिजमधील पहिला स्मार्टफोन Oppo R17 Pro आज म्हणजे 4 डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. याच्या लाँचिंगसाठी मुंबईमध्ये संध्याकाळी 8 वाजता एका इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं असून फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबवर हा इव्हेंट लाइव्ह पाहता येणार आहे. हा कंपनीचा पहिलाच असा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये सुपर VOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलजीचा वापर करण्यात आला आहे. केवळ 10 मिनिटांमध्ये 40 टक्क्यांपर्यंत हा फोन चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे.

यामध्ये इन-डिस्प्ले प्रिंट फिंगर सेंसर, वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले आणि 8 जीबी रॅम यांसारखी अनेक वैशिष्ट्य आहेत. यापूर्वी चीनमध्ये हा फोन सादर करण्यात आला आहे. किंमतीबाबत बोलायचं झाल्यास, चीनमध्ये या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या व्हेरिअंटची किंमत 3,999 चीनी युआन (40,800 रुपये), 8जीबी रॅम + 128 जीबी मेमरी असलेल्या व्हेरिअंटची किंमत 4,299 चीनी युआन (43,900 रुपये) आहे. 1 डिसेंबरपासून या स्मार्टफोनसाठी नोंदणी सुरू झाली आहे.

Oppo R17 Pro स्पेसिफिकेशन्स-
हा एक ड्युअल सिम स्मार्टफोन आहे, अँन्ड्रॉइड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.2 वर हा स्मार्टफोन कार्यरत असेल. यामध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. परफॉर्मंससाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर आहे. रॅमच्या बाबतीत फोनमध्ये 6 जीबी आणि 8 जीबी रॅमचा पर्याय मिळेल. तर इंटरनल मेमरीच्या बाबतीत केवळ 128 जीबी हाच पर्याय आहे. फोनमध्ये 20 आणि 12 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तसंच, सेल्फीसाठी 25 मेगापिक्सलचा कॅमेराही देण्यात आला आहे. फोनमध्ये 3650 एमएएच पावरची बॅटरी असून सुपर VOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलजीमुळे केवळ 10 मिनिटांमध्ये 40 टक्क्यांपर्यंत हा फोन चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे.

First Published on December 4, 2018 2:31 pm

Web Title: oppo r17 pro india launch today 4th december 2018