Oppo कंपनीच्या R सीरिजमधील पहिला स्मार्टफोन Oppo R17 Pro च्या विक्रीला सुरूवात झाली आहे. अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर कालपासून (दि.24) हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला असून त्यासोबत अनेक आकर्षक ऑफर्सही आहेत.

34 हजार 990 रुपये किंमत असलेला हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यास जिओकडून 4 हजार 900 रुपयांची सूट (किंवा अन्य फायदे) आणि 3.2 जीबी अतिरिक्त डाटा मिळणार आहे. याशिवाय एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने खरेदी करणाऱ्यास 5 टक्के आणि डेबिट कार्डने खरेदी करणाऱ्यास 10 टक्के सूट मिळणार आहे. याशिवाय नो-कॉस्ट इएमआयचा पर्यायही आहे.

यामध्ये इन-डिस्प्ले प्रिंट फिंगर सेंसर, वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले आणि 8 जीबी रॅम यांसारखी अनेक वैशिष्ट्य आहेत. हा एक ड्युअल सिम स्मार्टफोन आहे, अँन्ड्रॉइड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.2 वर हा स्मार्टफोन कार्यरत असेल. यामध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. परफॉर्मंससाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर आहे. रॅमच्या बाबतीत फोनमध्ये 6 जीबी आणि 8 जीबी रॅमचा पर्याय मिळेल. तर इंटरनल मेमरीच्या बाबतीत केवळ 128 जीबी हाच पर्याय आहे. फोनमध्ये 20 आणि 12 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तसंच, सेल्फीसाठी 25 मेगापिक्सलचा कॅमेराही देण्यात आला आहे. फोनमध्ये 3650 एमएएच पावरची बॅटरी असून सुपर VOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलजीमुळे केवळ 5 मिनिट चार्जिंग केल्यास दोन तासांपर्यंत टॉकटाइम इतका हा फोन चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे.