Oppo कंपनीने भारतीय बाजारात आपली सब-ब्रँड कंपनी Realme चा नवा फोन Realme 2 लॉन्च केला आहे. फुल एचडी नॉच डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये 6.2 इंचाची स्क्रिन देण्यात आली आहे. आयफोन X प्रमाणे हा डिस्प्ले देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा, स्लिम डिझाईन, गोरिल्ला ग्लास, तगडी बॅटरी, पोर्ट्रेट मोड, यांसारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.

Realme 1 हा फोन आधीपासूनच भारतीय बाजारात उपलब्ध असून या फोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीने Realme 2 लॉन्च करण्याचा निर्णय घेतला होता. Realme 2 हा फोन 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज या दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 4 सप्टेंबरपासून या फोनच्या विक्रीला सुरूवात होईल. केवळ फ्लिपकार्टवरुनच ग्राहकांना हा फोन खरेदी करता येईल. या फोनच्या 3 जीबी रॅमच्या व्हेरिअंटची किंमत 8 हजार 990 रुपये तर 4 जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत 10 हजार 990 रुपये आहे.

या फोनमध्ये क्वॉलकॉम ऑक्टाकोर 450 प्रोसेसर असून याच्या मागील बाजूला 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आणि पुढील बाजूला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, याशिवाय 4230mAh ची तगडी बॅटरी फोनमध्ये आहे.