ओप्पो कंपनीचा शानदार स्मार्टफोन  Oppo Reno 3 Pro आता स्वस्त झाला आहे. 8जीबी रॅम आणि 256जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेजसोबत येणाऱ्या या फोनच्या किंमतीत 3 हजार रुपयांपर्यंत कपात झाली आहे. या फोनमध्ये मागील बाजूला 64 MP च्या मुख्य कॅमेऱ्यासह क्वॉड-रिअर कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप आणि सेल्फीसाठी ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप, असे एकूण सहा कॅमेरे आहेत.

फीचर्स –
ओप्पो रेनो 3 प्रो ऑरोरा ब्लू, मिडनाईट ब्लॅक आणि स्काय व्हाईट अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी+ Super AMOLED डिस्प्ले आहे. मीडियाटेक हीलियो P95 SoC प्रोसेसर या फोनमध्ये असून अँड्ऱॉइड 10 वर आधारित कलर OS-7 वर हा फोन कार्यरत आहे. ओप्पो रेनो 3 प्रो मध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. यात 13 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, 64 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आहे. 2 मेगापिक्सलचा मोनो लेन्स, तर 8 मेगापिक्सलचा वाइड एंगल कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच ओप्पो रेनो 3 प्रो मध्ये मीडियाटेक हेलियो पी 95 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनसह, आपल्याला 4025mAh बॅटरी देण्यात आली असून 30W VOOC वेगवान चार्जिंग सपोर्टदेखील देण्यात आला आहे. ओप्पो रेनो 3 प्रो मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. यात यूएसबी टाइप सी कनेक्टर आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये तब्बल 44 मेगापिक्सलचा ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यातील दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. यासह, अल्ट्रा नाईट सेल्फी मोड, एआय नॉइस कॅन्सलेशन अशी वैशिष्ट्ये देखील आहेत.

Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

किंमत आणि ऑफर-
कंपनीने Reno 3 Pro च्या 8जीबी रॅम +128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत दोन हजार रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे आता हा फोन 27 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत 3 हजार रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे आता हा फोन 32 हजार 990 रुपयांऐवजी 29 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. किंमतीतील कपातीशिवाय कंपनी या फोनच्या खरेदीवर 31 ऑगस्टपर्यंत काही आकर्षक ऑफरही देत आहे. बँक ऑफ बडोदा किंवा फेडरल बँकेच्या क्रेडिट कार्डने फोन खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय फोन 1,333 रुपये ईएमआयवर खरेदी करण्याचा पर्यायही आहे.