ओप्पो कंपनीने Oppo Reno 4 Pro हा नवीन स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच लाँच केला. आज(दि.5) पहिल्यांदाच या फोनसाठी अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही वेबसाइटवर सेल आहे. याशिवाय ऑफलाइन प्लॅटफॉर्मवरुनही आजपासून हा फोन खरेदी करता येईल. कंपनीचा हा प्रीमियम स्मार्टफोन असून यामध्ये स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसरसह क्वॅड रिअर कॅमेरा सेटअप आहे.

किंमत –
Oppo Reno 4 Pro हा फोन  8GB रॅम आणि 128GB स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने 34 हजार 990 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवली आहे.  हा फोन स्टारी नाइट आणि सिल्की व्हाइट अशा दोन कलरच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. फोनमध्ये लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिम, सुपर AMOLED डिस्प्ले यांसारखे अनेक शानदार फीचर्स आहेत. सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर काही ऑफरही आहेत. सेलमध्ये काही निवडक बँकांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर 10 टक्के कॅशबॅकची ऑफर आहे. याशिवाय ग्राहकांना नऊ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही मिळेल.

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…

फीचर्स –
Oppo Reno 4 Pro मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED वॉटरफॉल डिस्प्ले आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये Sony IMX616 सेन्सरसह 32MP क्षमतेचा कॅमेरा आहे. फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर फीचर देण्यात आलं आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसरसह 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल. तर मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा मोनो आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स कॅमेरा आहे. कमी प्रकाशात चांगले फोटो काढता यावे यासाठी फोनमध्ये नाइट फ्लेअर पोर्ट्रेट मोडही आहे. फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4000mAh क्षमतेची बॅटरी यामध्ये असून कनेक्टिव्हिटीसाठी युएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे.