News Flash

कर्करोग टाळण्यासाठी संत्र्याचा ज्यूस गुणकारी!

दररोज संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने कर्करोग होण्याची शक्यता कमी असते, असे एका संशोधनातून दिसून आले आहे.

| September 17, 2013 12:35 pm

कर्करोग टाळण्यासाठी संत्र्याचा ज्यूस गुणकारी!

दररोज संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने कर्करोग होण्याची शक्यता कमी असते, असे एका संशोधनातून दिसून आले आहे. कर्करोगाला रोखण्यासाठी आवश्यक असणार अनेक घटक संत्र्यामध्ये असतात. त्यामुळे रोजच्या रोज त्याचे सेवन केल्याने कोणत्याही व्यक्तीला कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.
‘न्यूट्रिशन ऍंड कॅन्सर’ या जर्नलमध्ये या संशोधनासंदर्भात लेख छापण्यात आला आहे. संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने कर्करोगाची लागण होण्याची आणि त्याची वाढ होण्याची शक्यता मंदावते, असे संशोधकांना आढळून आले. अर्थात हवामान, लागवडीखालील जमीन, फळाची पक्वता आणि ज्यूस काढल्यानंतर तो साठवून ठेवण्यासाठी त्यामध्ये घातले जाणारे पदार्थ याचा कर्करोगाची लागण रोखण्यासाठी संत्र्यांमध्ये उपजत असणाऱया पदार्थांवर परिणाम होत असतो, असेही संशोधकांना आढळूले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2013 12:35 pm

Web Title: orange juice may keep cancer at bay
टॅग : Cancer 2,Lifestyle
Next Stories
1 दीर्घ रजेमुळे कर्मचारी नोकरी बदलण्यास उद्युक्त होतात!
2 आले नवे अ‍ॅप: हॅण्डसेट जोरात हलवा अन् गजर बंद करा!
3 कर्करोगाला नष्ट करणा-या प्रतिरोधक पेशीचा शोध
Just Now!
X