News Flash

दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी; ६०६० जागांची निघाली मेगाभरती

अर्ज करण्याची अखेरची तारीख नऊ फेब्रुवारी

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी ही मोठीच संधी आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डमध्ये तब्बल ६०६० पदांची मेगाभरती निघाली आहे.

ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डमार्फत विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ फेब्रुवारी २०२० पर्यंत आहे. अर्जदाराचे वय कमीत कमी १५ वर्ष आणि जास्तीत जास्त २४ वर्ष असावे. जनरल आणि ओबीसीच्या अर्जदारासाठी परिक्षा शुल्क १०० रूपये असून इतरांसाठी कोणतेही शुल्क नाही. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डत Non-ITI Category मध्ये २२१९ तर ITI Category मध्ये ३८४७ जागांची भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता :-
Non-ITI Category :- १0 वी उत्तीर्ण
ITI Category :- १0 वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण व NCVT किंवा SCVT मान्यता दिलेल्या कोणत्याही संस्थेचे संबंधित व्यापार प्रमाणपत्र.

अर्ज करण्यासाठी इथं क्लीक करा

जाहिरात पाहण्यासाठी इथं क्लीक करा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 9:03 am

Web Title: ordnance factory board recruitment 2020 nck 90
Next Stories
1 ‘ट्राय’कडून नववर्षाचं ‘गिफ्ट’, आता 130 रुपयांत 200 चॅनल्स
2 नाबार्डमध्ये नोकरीची संधी
3 संशोधकांनी बनवले अपघाताआधीच अ‍ॅलर्ट देणारे हेडफोन
Just Now!
X