News Flash

दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, इथे निघाली मेगाभरती

नोकरीसाठी संधीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

नोकरीसाठी संधीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे, या भरती प्रक्रियेसाठी कोणतेही आर्थिक शुल्क आकारले जाणार नाही. तसेच या पदांसाठीची वयोमर्यादा १५ ते २४ वर्ष अशी असून शासकीय नियमानुसार वयात सूटही देण्यात आली आहे.

नागपूरमधील ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीमार्फत विविध ४८०५ पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आज बुधवारपासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून डिसेंबरअखेरपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतात.

आणखी वाचा- महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये १८४७ पदांची भरती

शैक्षणिक पात्रता :-
Non-ITI Category :- १0 वी उत्तीर्ण / समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.
ITI Category :- १0 वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण व NCVT किंवा SCVT मान्यता दिलेल्या कोणत्याही संस्थेचे संबंधित व्यापार प्रमाणपत्र.

जाहिरात पाहण्यासाठी इथं क्लीक करा –
अर्ज करण्यासाठी इथं क्लीक करा –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 1:57 pm

Web Title: ordnance factory recruitment 2019 ofb bharti 2019 nck 90
Next Stories
1 TATA ची नवी कार Altroz ; 21 हजारात बुकिंगला सुरूवात
2 BS-6 इंजिनसह Mahindra XUV 300 झाली लाँच, किंमतीत बदल
3 64MP चा दमदार कॅमेरा, Redmi Note 8 Pro खरेदी करण्याची अजून एक संधी
Just Now!
X