पॅन कार्ड मिळवणं आता अधिक सोपं होणार आहे. अर्ज केल्याच्या काही मिनिटांमध्येच पॅन कार्ड तुमच्या हातात मिळेल. आयकर विभाग लवकरच पॅनकार्ड बनविण्यासाठी नवी सेवा लाँच करण्याच्या तयारीत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पुढील काही आठवड्यांमध्ये ही नवी सेवा सुरू होईल. या नव्या सेवेचा फायदा अर्जदारासोबतच ज्यांचं पॅन कार्ड हरवलंय किंवा डुप्लिकेट पॅनकार्डसाठी ज्यांनी अर्ज केलाय त्यांनाही होईल.

इलेक्ट्रॉनिक पॅन अर्थात ePAN सुविधा सर्व अर्जदारांसाठी मोफत असेल. ePAN तयार करताना आधार कार्डवरील माहिती पडताळली जाईल, त्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल. त्यानंतर आधारवरील नाव, जन्मदिनांक, वडिलांचे नाव, पत्ता इत्यादी माहिती ऑनलाइन अॅक्सेस केली जाईल. PAN card तयार करण्यासाठी ठराविक माहिती वगळता कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसेल. एकदा PAN जनरेट झाल्यानंतर अर्जदाराला एक डिजिटल स्वाक्षरी असलेलं ePAN दिलं जाईल. यामध्ये एक QR कोड असेल. फसवणूकीला आळा घालण्यासाठी क्यूआर कोडमध्ये माहिती इनक्रिप्ट केली जाईल.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…
Regional Transport Authority application
तब्बल दीड हजार दिवसांचा उशीर! ग्राहक आयोगाने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना…

एका पायलट प्रोजेक्टअंतर्गत आठ दिवसांत 62 हजारांहून अधिक ePAN जारी करण्यात आले आहेत. लवकरच देशभरात हा प्रोजेक्ट सुरू करण्यात येईल. प्राप्तिकराच्या सेवा डिजिटल करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे.