22 November 2017

News Flash

पंजाब नॅशनल बँकेत खाते आहे? तर हे अवश्य जाणून घ्या..

१ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 11, 2017 6:02 PM

पंजाब नॅशनल बँक

देशातील सरकारी क्षेत्रात कार्यरत असणाऱी आणि दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेतर्फे एक नवा नियम लागू केला जाणार आहे. बँकेने आपल्या एटीएम वापराच्या मोफत व्यवहारांवर मर्यादा आणली आहे. पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम वापरणाऱ्यांना आता महिन्यातून केवळ ५ वेळाच पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममधून मोफत पैसे काढता येणार आहेत. त्यानंतर पैसे काढायचे असल्यास बँकेकडून विशिष्ट शुल्क आकारले जाणार आहेत. बँकेने ही माहिती देणारी नोटीस आपल्या ग्राहकांना पाठवली आहे. या नोटीसमध्ये म्हटल्याप्रमाणे बँकेचा हा नवा नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

आईने मुलींची नावं ठेवली ‘G S T’

सेव्हिंग खाते, करंट खाते आणि ओव्हरड्राफ्ट खाते असणाऱ्या खातेधारकांना ५ हून अधिकवेळा एटीएममधून पैसे काढायचे असल्यास १० रुपये इतके अतिरीक्त शुल्क भरावे लागणार आहे. मात्र एटीएमच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या बॅलन्स एनक्वायरी, फंड ट्रान्सफर, पिन चेंज यांसारख्या नॉन फायनान्शिअल व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचेही बँकेने स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर काही अपलोड करताय? सावधान !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून २०१४ मध्येच अशाप्रकारे एटीएमच्या वापराबाबतचा नियम करण्यात आला होता. त्यानुसार बँकांना आपल्या एटीएमच्या वापरासाठीच्या व्यवहारांची संख्या निश्चित करण्यास सांगण्यात आले होते. यामध्ये ५ व्यवहार मोफत देण्यात यावेत असेही रिझर्व्ह बँकेने सुचविले होते. यानंतरच्या व्यवहारांसाठी किती शुल्क आकारायचे याबाबतचा निर्णय संबंधित बँकेने घ्यावा असे या निर्णयात म्हणण्यात आले होते. मात्र ५ मोफत व्यवहारांनंतरच्या व्यवहारांवर आकारण्यात येणारे शुल्क २० रुपयांहून अधिक नसावे असेही आरबीआयने दिलेल्या नियमांमध्ये नमूद करण्यात आले होते. सध्या एसबीआय, आयसीआयसीआय, यस बँक यांसारख्या अन्य बँकांमध्येही एटीएममधून केवळ ५ वेळाच मोफत पैसे काढता येतात. त्यानंतरच्या व्यवहारांसाठी शुल्क आकारण्यात येते.

First Published on September 11, 2017 6:02 pm

Web Title: panjab national bank set limit of free transactions according to rbi rule