सुझुकी लवकरच आपली शानदार SUV सुझुकी जिम्नी नेक्स्ट जनरेशन मॉडल लॉन्च करणार आहे. 2018 पॅरिस मोटार शोमध्ये कंपनीने ही आकर्षक गाडी सादर केली. पुढील वर्षीपासून या गाडीची विक्री सुरू होईल. 2015 नंतर पहिल्यांदाच कंपनीने सुजुकी जिम्नी नेक्स्ट जनरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. जाणून घेऊया कशी असेल ही कार आणि काय आहेत फिचर्स.
इंजिन आणि पावर –
इंजिन आणि पावरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास या कारमध्ये 1.5 लिटरचं 4 सिलेंडर असलेलं डिझेल इंजिन देण्यात आलं असून याद्वारे 101 बीएचपी पावर आणि 96 lb ft टॉर्क जनरेट होतं. 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 4 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेलं हे इंजिन जुन्या 1.3 लिटरच्या इंजिनला रिप्लेस करेल.
फिचर्स – ग्राउंड क्लिअरन्स – 210 मिमी
लॅडर फ्रेम चेसिस, थ्री लिंक रिजिड ऐक्सल सस्पेंशन,
4 व्हील ड्राइव्ह सिस्टम,
सिंपल बॉक्स शेप बॉडी,
व्हर्टिकल ग्रिल,
राउंड हेडलाइट,
दोन फोल्डिंग रिअर सीट,
377 लीटरचं लगेज स्पेस,
15 इंच एलॉय व्हील,
पावर स्टीअरिंग,
पावर विंडो,
7.0 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम,
ब्लूटूथ
सेफ्टी फीचर्स – सेफ्टी फीचर्सच्या बाबतीत सांगायचं झाल्यास यामध्ये एसयूव्ही एअरबॅग, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इमर्जेंसी ब्रेकिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, ट्रॅफिक साइन डिटेक्शन
किंमत – कंपनीने नव्या जिम्नीच्या किंमतीबाबत काहीही माहिती दिलेली नाही, पण लॉन्चिंगच्या वेळेसच किंमतीचा खुलासा केला जाणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 3, 2018 5:22 pm