मेंदूत मेदाचे विशिष्ट रेणू साठल्याने कंपवाताची (पार्किन्सन) सुरुवातीची लक्षणे दिसत असतात असे एका अभ्यासात दिसून आले आहे. यातून पार्किन्सनचा  प्रादुर्भाव होण्याची शक्यता ओळखता येऊ शकते तसेच लवकर उपचार सुरू करता येतात. पार्किन्सन हा रोग मेंदूचा ऱ्हास झाल्याने होतो. त्यात मेंदूच्या पेशी खूपच कमी होतात. डोपॅमाइन न्यूरॉनची संख्या घटणे हे त्याचे वैशिष्टय़ असते. मेंदूतील सबस्टॅशिया नायग्रा या भागात हालचाल प्रारंभाचा संबंध असतो त्यावर यामुळे परिणाम होतो. आतापर्यंत या चेतापेशीं गमावणे हे अल्फा सायन्युक्लीन हे प्रथिन साचण्यास कारण ठरत होते. गेल्या पंधरा वर्षांत संशोधकांनी जो अभ्यास केला त्यानुसार लायसोमल साठवणीशी संबंधित गॉशर डिसीजशी पर्यायाने ग्लुकोसेरेब्रोडिज या जनुकाशी पार्किन्सनचा संबंध जोडला गेला आहे. ग्लुकोसेरेब्रोडिज म्हणजे जीबीए जनुक हे मेदाचे विघटन करणारी वितंचके तयार करते पण काही जणांमध्ये ‘गॉशर डिसीज’ नसतानाही जनुकांची एक सदोष आवृत्ती येते त्यामुळे पार्किन्सन होण्याची शक्यता ७ ते १० पट वाढते याचा अर्थ मेंदूत मेदाचे साचणे हे त्याचे कारण असते. ग्लायकोस्फिनगोलिपिडस हे सबस्टॅनशिया नायग्रा भागात साचतात. असे हार्वर्ड मेडिकल स्कूलचे ओल आयझ्ॉकसन यांनी म्हटले आहे. वयपरत्वे हानी होऊन कंपवात म्हणजे पार्किन्सन होतो हे खरे असलेतरी त्यात मेद साचणे हे कारण असते. वयानुसार मेद वाढतो तसाच तो जनुकीय दोषानेही वाढतो असा याचा अर्थ आहे. मेदामुळे चेतापेशीत गुंतागुंत निर्माण होते. ती लक्षात आली तर पार्किन्सनचे निदान लवकर करता येते. मेंदूतील मेदबदलांवर तातडीने इलाज केल्यास या रोगावर मातही करता येऊ शकते असे पेनी हॅलेट या शोधनिबंध लेखकाचे म्हणणे आहे.