गणेशोत्सवासारखे सणवार म्हटले की कुटुंबातील मंडळींची एका अर्थ चंगळ असते. कारण घरातील सुगरणीने मनापासून बनवलेल्या गोडाधोडाच्या पदार्थांवर ताव मारण्याची संधी या काळात मिळते. प्रत्येक महिलेमध्ये विशिष्ट पदार्थ बनविण्याची कला असते. घरातील सुगरणीची खासियत असलेल्या अशाच पदार्थांना कौतुकाची थाप मिळावी यासाठी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने पुढाकार घेतला आहे. महिलांसाठी एका खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामधील विजेत्यांना आकर्षक बक्षीसे मिळणार आहेत. भाग्यवान विजेत्याला कुटुंबासह गोव्यामध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. याबरोबरच आठवड्याला खास बक्षीसंही मिळणार आहेत.

त्यामुळे उकडीचे मोदक बनवण्याची एखादी वैशिष्ट्यपूर्ण पद्धत असो, वा पुरणपोळीला खास तुम्ही दिलेला टच असो किंवा श्रीखंडासारखा सर्वमान्य परंतु तुमच्या सर्जनशीलतेतून बनलेलं वेगळ्या धाटणीचा पदार्थ असो, हे व्यासपीठ तुमच्यासाठी खुलं आहे.

महिला असो वा पुरूष तुमच्यातल्या शेफमध्ये असणाऱ्या सुप्त कलेला या माध्यमातून वाव मिळणार असून तुमच्या पाककला जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. या माध्यमातून तुम्ही तुमच्या भागात प्रसिद्ध असणारी, परंतु देशातल्या अन्य लोकांना अपरिचित असलेली पाककृतीही जगभरात पोहोचवू शकणार आहात. प्रेस्टिज सहप्रायोजक असलेल्या या पाककला स्पर्धेचे ग्रेटर बँक गोल्ड लोन हे बँकिंग पार्टनर आहेत. चला तर मग या खास पाककला स्पर्धेत सहभागी व्हा आणि तुमच्यातल्या पाककलेच्या कौशल्याला वाव द्या! सहभागासाठी भेट द्या: indianexpress-loksatta.go-vip.net/paakkala