19 January 2021

News Flash

Signal ची लॉटरी लागली! लोकप्रियता प्रचंड वाढली, एलन मस्कनंतर पेटीएम सीईओही म्हणाले ‘Signal वापरा’

सिग्नल अ‍ॅपच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ...

(संग्रहित छायाचित्र, पीटीआय )

नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षाच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्ती आणल्या व व्हॉट्सअ‍ॅपविरोधात गदारोळ सुरू झाला. नवीन प्रायव्हसी पॉलिसी जर तुम्ही अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. अशात व्हॉट्सअ‍ॅपविरोधात युजर्समध्ये नाराजी असून याचा चांगलाच फायदा सिग्नल अ‍ॅपला होताना दिसतोय.

काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवर सिग्नल अ‍ॅप वापरण्याचं आवाहन केलं होतं. मस्क यांनी आपल्या 41.5 मिलियन फॉलोअर्सना सिग्नल वापरण्याचं आाहन केल्यापासून या अ‍ॅपच्या डाउनलोडिंगमध्ये वाढ झाली आणि लोकप्रियताही वाढली. त्यानंतर आता भारतातील पेटीएम कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनीही भारतीयांना सिग्नल अ‍ॅपचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.

(समजून घ्या : WhatsApp च्या नवीन धोरणांमुळे कोणती माहिती जाहीर होणार?)

“भारतात व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक त्यांच्या एकाधिकाराचा चुकीचा वापर करत असून लाखो युजर्सची प्रायव्हसी गृहीत धरली जातेय. आता आपण सिग्नल अ‍ॅप वापरण्यास सुरूवात करायला हवी”, असं ट्विट करत विजय शेखर शर्मा यांनी सिग्नल अ‍ॅप वापरण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, सिग्नल अ‍ॅपच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली असून आता अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सिग्नल अ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅपवरही मात केली आहे. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या फ्री अ‍ॅप्सच्या यादीत सिग्नल अ‍ॅप पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकून भारतातील अव्वल फ्री अ‍ॅप बनल्याची माहिती सिग्नल अ‍ॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिलीये. यासोबत एक स्क्रीनशॉटही शेअर केला असून कॅप्शनमध्ये ‘बघा तुम्ही काय केलं?’, अशा आशयाचं ट्विट केलं आहे. भारताशिवाय जर्मनी, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँग काँग आणि स्विझर्लंड या देशांमध्येही सिग्नल टॉप डाउनलोड अ‍ॅप ठरलं आहे.


काय आहे सिग्नलची खासियत :
सिग्नल अ‍ॅपद्ववारे तुमचा पर्सनल डेटा मागितला जात नाही किंवा स्टोअरही केला जात नाही. त्यामुळे हा डेटा कोणासोबत शेअर करण्याचा प्रश्नच येत नाही. सिग्नलवर फक्त तुमचा फोन नंबर स्टोअर केला जातो. ग्रुप व्हिडिओ कॉलिंग आणि जुने मेसेज आपोआप गायब होण्याचं फिचरही यामध्ये आहे. याशिवाय सिग्नलची खासियत म्हणजे यात ‘डेटा लिंक्ड टू यू’ (Data Linked to You) फिचरही दिलं आहे. हे फिचर सुरू केल्यानंतर कोणीही चॅटिंग करताना चॅटचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. म्हणजेच तुमची चॅटिंग पूर्णतः सुरक्षित असते.

(Google वर दिसायला लागले WhatsApp चे प्रायव्हेट ग्रुप, सर्च करुन कोणीही होऊ शकतं जॉइन)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 10:25 am

Web Title: paytm ceo posts move on to signal now says facebook and whatsapp abusing monopoly sas 89
Next Stories
1 “सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवशी अश्विनला सरळ उभंही राहता येत नव्हतं”, पत्नीने केली इमोशनल पोस्ट
2 पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्ये केलं किळसवाणं कृत्य, व्हिडिओ होतोय व्हायरल
3 शेतकऱ्याची कमाल! सिंचनासाठी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या टोलवाटोलवीला कंटाळून केला ‘अविष्कार’
Just Now!
X