22 September 2020

News Flash

आता Paytm द्वारे करा शेअर्सची खरेदी-विक्री, लाँच झालं खास फीचर; जाणून घ्या डिटेल्स

'स्टॉक ट्रेडिंग' फीचर झालं लाँच

(पेटीएम अ‍ॅपचे संग्रहित छायाचित्र)

‘पेटीएम मनी’द्वारे (Paytm Money) आता तुम्ही कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्रीही करु शकणार आहात. यासाठी ‘पेटीएम’ने आपल्या ऑनलाइन गुंतवणूक आणि वेल्थ मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म ‘पेटीएम मनी’वर स्टॉक ट्रेडिंग (Stock trading) फीचर लाँच केलं आहे.

सध्या पेटीएमने हे फीचर केवळ बीटा व्हर्जनच्या केवळ 80 हजार अँड्रॉइड युजर्ससाठी सुरू केलं आहे. येत्या सहा ते आठ आठवड्यांमध्ये सर्व युजर्ससाठी रिटेल शेअर ब्रोकिंग सेवा (Share Broking Service)सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.

शेअर ब्रोकिंगसाठी KYC आणि अकाउंट सुरू करण्याची प्रक्रियाही पूर्णतः पेपरलेस असेल, असे पेटीएमने म्हटले आहे. युजर या अ‍ॅपद्वारे डिजिटल पद्धतीने आपलं डीमॅट अकाउंट सुरू करु शकतात. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासोबतच शेअर्सची खरेदी-विक्री आणि कोणत्याही कंपनीच्या शेअर्सबाबत सविस्तर माहिती मिळवू शकतात. याशिवाय, पेटीएम मनीद्वारे युजर्सना शेअर मार्केटमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्सची ट्रेडिंग करता येईल. तसेच, युजर्स 50 स्टॉक्सचे रिअल टाइम मूल्य सहज ट्रॅक करु शकतात आणि आपल्या सोयीप्रमाणे अलर्ट सेट करु शकतात.

“या प्लॅटफॉर्मद्वारे नवीन आणि जुन्या गुंतवणूकदारांना डिजिटल व सुरक्षित वातावरणात शेअर्समध्ये गुंतवणूक व व्यापार करता येईल”, असे Paytm चे सीईओ वरुण श्रीधर म्हणाले. “सध्या या फीचरची टेस्टिंग सुरू आहे, त्यामुळे काही निवडक युजर्सनाच त्याचा वापर करता येत आहे. पण लवकरच सर्व युजर्ससाठी आम्ही हे फीचर उपलब्ध करु. पुढील वर्षापर्यंत Paytm money वर 2.5 लाखांपेक्षा जास्त सक्रिय युजर्स मिळवणं हे कंपनीचं लक्ष्य आहे, असंही श्रीधर यांनी सांगितलं.

कसं ओपन करायचं डिमॅट अकाउंट? –
– Paytm money अ‍ॅपवर जाऊन ओपन डिमॅट अकाउंटवर क्लिक करा आणि फॉर्म भरा
– यानंतर तुम्हाला पेटीएमकडून एक फोन येईल आणि मोबाइलवर एसएमएसद्वारे व ई-मेल आयडीवर एक लिंक पाठवली जाईल.
– या लिंकवर क्लिक करुन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
– केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या 24 तासांमध्ये तुम्हाला क्लाइंट आयडी आणि पासवर्ड मिळेल
– पेटीएम मनीवर अकाउंट ओपन करण्यासाठी 300 रुपये आणि डिजिटल केवायसीसाठी 200 रुपये शूल्क द्यावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 3:59 pm

Web Title: paytm money launches stock broking plans to start retail stock broking in 6 8 weeks sas 89
Next Stories
1 लहान वयात मुलांना चष्मा लागतो? घ्या ‘ही’ काळजी
2 Infinix चा लेटेस्ट ‘बजेट’ स्मार्टफोन, 5000mAh बॅटरीसह एकूण चार कॅमेरे
3 पोटाच्या विकारापासून ते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापर्यंत तोंडली खाण्याचे फायदे
Just Now!
X