पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीए) ने आज जाहीर केले की १ कोटी फास्‍टटॅग्‍स देण्याचा टप्पा गाठणारी ही पहिली बँक बनली आहे. हे देशामध्‍ये ३२ बँकांकडून जारी करण्‍यात आलेल्‍या एकूण फास्‍टटॅग्‍सपैकी जवळपास ३० टक्‍के आहे. मागील ६ महिन्‍यांमध्‍ये पीपीबीएलने ४० लाखांहून अधिक व्‍यावसायिक व खाजगी वाहनांना फास्‍टटॅग्‍ससह सज्‍ज केले आहे.  या व्यतिरिक्त, पेटीएम पेमेंट्स बँक ही राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्‍शनसाठी (एनईटीसी) आंतरराष्ट्रीय स्तरावरील टोल पेमेंट सोल्यूशनसाठी टोल प्लाझाची भारतातील सर्वात मोठी अधिग्रहण कर्ता आहे. बँकेने राष्‍ट्रीय व राज्‍य महामार्गावरील २८० टोल प्‍लाझांना डिजिटली टोल शुल्‍क गोळा करण्‍यामध्‍ये सक्षम केले आहे.

पेटीएम पेमेंट्स बँक ऑटोमॅटिक नंबर प्‍लेट रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करत मल्‍टी-लेन फ्री-फ्लो हालचालींची तपासणी व अंमलबजाणी करण्‍यासाठी देखील एनएचएआयसोबत सहयोगाने काम करत आहे. यामुळे राष्‍ट्रीय महामार्गांवर प्रवास करताना ग्राहकांच्‍या अनुभवामध्‍ये सुधारणा होईल. पेटीएम फास्‍टटॅग हे पेटीएम वॉलेटशी लिंक आहे.

वेगळे अकाऊंट तयार करण्याची गरज नाही

पीपीबीएल फास्‍टटॅग देशातील सर्वात पसंतीची टोल पेमेंट पद्धत बनली आहे. यामुळे युजर्सना थेट पेटीएम वॉलेटमधून देय भरण्‍याची सुविधा मिळते. युजर्सना त्‍यांचे फास्‍टटॅग्‍स रिचार्ज करण्‍यासाठी इतर वेगळे अकाऊंट तयार करण्‍याची किंवा वॉलेट डाऊनलोड करण्‍याची गरज नाही. फास्‍टटॅग जारी करण्‍याची प्रक्रिया जलद, सुलभ व सोईस्‍कर आहे आणि यासाठी अनेक कागदपत्रे किंवा वेगळे लॉगइन क्रेडेन्शियल्‍सची गरज नाही. इतर बँकांमधील टॅग्‍स कार्यान्वित होण्‍यासाठी अधिक वेळ लागू शकतो, पण पीपीबीएल फास्‍टटॅग्‍स युजर्सना मिळताच त्‍वरित कार्यान्वित होतात. सर्व फास्‍टटॅग व्‍यवहार पेटीएम अॅपवर पाहता येऊ शकतात.

ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा

बँकेने कार्यक्षम ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा देखील कार्यान्वित केली आहे, जी खात्‍यामधून कमी झालेल्‍या अयोग्‍य शुल्‍कांना ओळखेलं आणि अतिरिक्‍त शुल्‍क परत करण्‍यासाठी त्‍वरित क्‍लेम करेल. ही यंत्रणेद्वारे संबंधित टोल व्यवहाराच्या आणि ग्राहकांच्या सर्व तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी टोल प्लाझाद्वारे उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे संपूर्ण परीक्षण केले जाते.पीपीबीएलने निवारण चक्राच्‍या माध्‍यमातून आतापर्यंत सर्व ग्राहक तक्रारींचे समाधान केले आहे आणि त्‍यांच्‍या फास्‍टटॅग युजर्सच्‍या वतीने ८२ टक्‍के केसेस जिंकल्‍या आहेत.

पेटीएम पेमेंट्स बँक लिमीटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सतिश गुप्‍ता म्‍हणाले, ”आमचे युजर्स व टोल ऑपरेटर्सना अखंड व त्रासमुक्‍त फास्‍टटॅग सेवा देत भारतामध्‍ये डिजिटल टोल पेमेंट्सच्‍या अवलंबलतेमध्‍ये अग्रस्‍थानी असण्‍याचा खूप आनंद होत आहे. आम्‍ही तंत्रज्ञानामध्‍ये केलेल्‍या इनोवेशनमुळे आणि आमच्‍या बँकेवरील विश्‍वासाने आम्‍हाला नॅशनल इलेक्‍ट्रॉनिक टोल कलेक्‍शन (एनईटीसी) प्रोग्रामअंतर्गत अव्‍वल जारीकर्ता व सर्वात मोठी अधिग्रहण कर्ता बँक बनण्यासाठी मदत केली आहे. आमच्‍या पेमेंट्स तंत्रज्ञानासह देशभरात डिजिटल महामार्ग निर्माण करण्‍याच्‍या शासनाच्‍या उपक्रमाला अधिक पुढे घेऊन जाण्‍याचे कार्य सुरू ठेवण्‍याचा आमचा मनसुबा आहे.”