फळे खाणे आरोग्यासाठी चांगले असते असे आपण नेहमी ऐकतो. ऋतूनुसार त्या ऋतूतील फळे आवर्जून खायला हवीत. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. फळांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते असे डॉक्टरही अनेकदा सांगतात. मात्र, लहान मुले किंवा अगदी मोठी माणसेही फळे खाण्याचा कंटाळा करताना दिसतात. सफरचंद हे फळ आरोग्याला अतिशय उपयुक्त असे फळ आहे असे म्हटले जाते. ज्येष्ठांना आणि गर्भवती महिलांना आवर्जून सफरचंद खाण्यास सांगितले जाते. पण अनेकांना सफरचंद साल काढून खायची सवय असते. मात्र, सफरचंदाची साल आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. पाहूयात सफरचंदाच्या सालांचे उपयोग.

१. सफरचांदाची साल रक्तातील सारखेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे ज्यांना मधुमेह असेल त्यांनी सफरचंद सालासकट खाणे गरजेचे आहे.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Home alone safety tips
मुलांना घरी एकटे ठेवण्याशिवाय पर्याय नाही? नोकरी करणाऱ्या पालकांनी मुलांना शिकव्यात ४ महत्त्वाच्या गोष्टी
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
The senior clerk of Ghati Hospital was caught by the anti corruption department team while taking Rs
घाटी रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक तीन हजार घेताना “लाचलुचपत” च्या सापळ्यात

२. सफरचंदाच्या सालीमुळे मेंदूतील पेशी लवकर खराब होत नाहीत. तसेच यामुळे बुद्धी चलाख होण्यास मदत होते. त्यामुळे सालीसकट खाल्लेले सफरचंद फायद्याचे असते.

३. मोतीबिंदूपासून बचाव होण्यासाठी सफरचंद सालीसकट खाण्याने मदत होते. तसेच नियमितपणे सफरचंद खाल्ल्यास मोतीबिंदू होत नाही.

४. सफरचंदात जास्त प्रमाणात फायबर असल्याने पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी ते अतिशय उपयुक्त असते. यामुळे शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठीही मदत होते. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांच्यासाठीही सफरचंद खाणे फायदेशीर असते.

५. सफरचंद हे दातांना किडण्यापासून बचाव करते. याशिवाय गर्भवती महिलांमध्ये रक्तवाढीसाठी सफरचंद उपयुक्त ठरते. त्यामुळे सफरचंदाचा आहारातील समावेश तोही सालांसकट अतिशय महत्त्वाचा असतो.